Pune schools
Pune schools  
पुणे

मोठी बातमी : आता पहिली ते आठवीचे वर्गही पूर्णवेळ भरणार

सरकारनामा ब्युरो

पुणे : गेल्या दोन वर्षांपासून राज्यात कोरोना विषाणूच्या (Corona virus) संसंर्गामुळे शाळा-महाविद्यालये बंद होती. प्राथमिक आणि माध्यमिकचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने सुरू होते. पुण्यातही (Pune) शाळा सुरू झाल्या. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा परिणाम पाहता तिसऱ्या लाटेतही शाळा सुरु करण्यासंबंधी प्रशासनामध्येही संभ्रम पाहायला मिळाला. आता मात्र पुण्यातील कोरोना (Corona cases in Pune) कोरोना रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. त्यासोबतच लसीकरणालाही वेग आला आहे. या पार्श्वभुमीवर पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पुण्यातील शाळांच्या (Pune School) संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (Pune Schools Reopening news)

पुण्यातील प्राथमिक आणि माध्यमिकचे वर्ग पुर्णवेळ सुरु करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. राज्यसरकारने 1 फेब्रुवारीपासून शाळा-महाविद्यालये सुरू (Pune School colleges reopen) करण्याचा निर्णय घेतला होता. पुण्यातील कोरोना संसर्गाची स्थिती पाहता पहिली ते आठवीचे वर्ग हे चार तासच भरवले जात होते. पण आता पहिली ते आठवीचे वर्गही पूर्णवेळ भरवण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुण्यातील कोरोनाच्या स्थितीच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा बैठकीत अजित पवार बोलत होते. 1 फेब्रुवारीपासून पुण्यातील शाळा सुरू झाल्या, पण पहिली ते आठवीचे वर्ग अर्धा वेळ भरवण्यात येत होत्या. पण आता पहिली ते आठवीचे वर्ग पण पूर्णवेळ भरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुण्यातील पहिली ते आठवीचे वर्गही पूर्ण वेळ भरवण्यात येणार आहेत. जिल्ह्यात लसीकरणालाही वेग आला असून, अनेकांचा पहिला डोस झाला आहे. तर पुणे जिल्ह्यातील दुसऱ्या डोसचे प्रमाणही 86 टक्के इतके झाले आहे. पण पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात 15 ते 18 वयोगटातील लसीकरणाचे प्रमाणही कमी झालं आहे. ग्रामीण भागात चांगले लसीकरण झाले आहे. 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीचा तुटवडा आहे. पण येत्या सोमवारी लसींचा साठा उपलब्ध होईल. मी सुद्धा मुंबईत गेल्यावर संबंधितांशी बोलतो. राज्यात कुठेही लसींचा तुटवडा पडू नये यासाठी लवकरात लवकर निर्णय घेऊ, असेही यावेळी अजित पवार यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, आपल्या देशात गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोरोना रुग्णसंख्येत 30 टक्क्यांनी घट झाली आहे. पुण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर, पुण्यातील कोरोना अजून संपलेला नाही.कारण अजूनही सक्रिय रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे एक दोन आठवड्यांनंतर शहरातील निर्बंधांबाबत निर्णय घेऊ, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. शहरात जंबो कोवीड सेंटर सध्या उभे असले तरी त्यात रुग्ण नाहीत. मात्र, 28 फेब्रुवारीपर्यंत ते सुरु ठेवण्यात येणार आहेत. पुण्यात अजूनही 45 हजार सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे एकदोन आठवड्यांनंतर पुण्यातील निर्बंधांबाबत निर्णय घेतला जाईल,असेही त्यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT