Jayant Patil Sarkarnama
पुणे

सीबीआय-इन्कमटॅक्स या संस्था भाजपाचे नेते चालवताहेत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरावर धाडी टाकल्या.अजित पवार यांना बदनाम करण्यासाठी या धाडी टाकली जात आहे.

umesh ghongade

सरकारनामा ब्यूरो

पुणे : केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभाग (सीबीआय), सक्त वसुली संचलनालय (ईडी), प्राप्तीकर विभाग (इन्कमटॅक्स) या केंद्रीय संस्था अधिकाऱ्यांऐवजी भारतीय जनता पार्टीचे नेते चालवत आहेत, अशी टीका जलसंधारण मंत्री व राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरावर धाडी टाकल्या.अजित पवार यांना बदनाम करण्यासाठी या धाडी टाकली जात आहे.भाजपा नेते ज्यांचे नाव घेतात त्यांच्यावर सीबीआय, ईडी आणि इन्कमटॅक्स कारवाई करत आहे.त्यामुळे सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्स या संस्था आधिकारी नव्हे तर भाजपाचे नेते चालवतात, असे जयंत पाटील सांगितले. सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे आमदार अरूण लाड यांच्या नागरी सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

शेतकऱ्यांना चिरून मारले तरी देशाचे पंतप्रधान काहीच बोलत नाहीत. ते खासगीकरणात व्यस्त आहेत. सरकारी कंपन्या खासगी संस्थांना विकण्याचे काम सध्या सुरू आहे.याचा परिणाम महागाई वाढण्यात होईल हे आपण सर्वांनी ध्यानाता घ्यायला हवे.या सरकारच्या काळात शेतकऱ्याला चांगले दिवस येण्याची शक्यता नाही.शेतकऱ्यांचे हीत या सरकारला करायचेच नाही, अशी टीका पाटील यांनी केली.

सोयाबीनचा दर क्विंटलला 11 हजारावर पोचले होत. मात्र, मोठ्याप्रमाणात आयात करण्यात आल्याने सोयाबिनचे दर पुन्हा कोसळले. शेतकऱ्यांना दोन पैसे मिळायची वेळ आली असताना या सरकारने ते मिळू दिले नाहीत.सरकारची ही वृत्ती वारंवार दिसून येत असून शेतकऱ्यांचे नुकसान आम्ही सहन करणार नाही, असा इशारा पाटील यांनी दिला.

केंद्र सरकारचे कायदे शेतकऱ्यांसाठी जाचक आहेत. याविरोधात आवाज उठविला नाही तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. कुणी आवाज उठविण्याचा प्रयत्न केा तर हे सरकार सीबीआय, इन्कमटॅक्स, आयकर विभागाच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न करते. अशाच प्रकारे छगन भुजबळ यांना अटक केली. न्यायालयाने भुजबळ यांना निर्दोष जाहीर केले आहे.अनिल देशमुख यांनादेखील साच त्रास देण्यात येत आहे, असे पाटील यांनी सांगितले.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT