Sharad Pawar latest news
Sharad Pawar latest news 
पुणे

शरद पवारांनी विरोधकांची लाज काढली; सध्याचे राज्यकर्ते सभ्य आणि सुसंस्कृत नाहीत...

सरकारनामा ब्युरो

पुणे : ''केंद्रीय यंत्रणांनाचा वापर करणे दडपशाही करणे हे अजिबात योग्य नाही. पण सध्याचे राज्यकर्ते सभ्य आणि सुसंस्कृत असे राज्यकर्ते नाहीत. असं केल्याने त्यांच्या विचाराशी संघर्ष करणारा जो घटक त्यांच्यापुढे शरणागती पत्करेल असं जर त्यांना वाटत असेल तर त्यात कधीही यश येणार नाही.'' अशा शब्दांत शरद पवार (Sharad Pawar) यांनी विरोधकांवर टीका केली.

महाराष्ट्र कनेक्ट काँक्लेव्ह अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांची ज्ञानेश महाराव यांनी शनिवार (4 जून) पुण्यात मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक घडामोडींवर प्रतिक्रिया दिल्या.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवरच ईडी, आयकर विभागाच्या कारवाया होत आहेत. पण भाजप नेत्यांवर यंत्रणांकडून कोणतीही कारवाई होत नाही. तुम्ही देखील सत्तेत राहून प्रशासकीय कामकाज पाहिलं आहे, अशा पद्धतीने खुलेआम केंद्रीय यंत्रणांचा वापर करणं हे कितपत योग्य आहे? असा सवाल शरद पवार यांना विचारण्यात आला.

विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी मलाही नोटीस आली होती, हे तुम्हाला आठवत असेल तेव्हा मी आमच्या सहकाऱ्यांना सकाळी आपल्याला ईडी कार्यालयात जायचं असल्याचं सांगितलं आणि ईडीच्या कार्यालयातही मी येत असल्याच सांगण्यासाठी फोन केला. तर, ईडीचे अधिकारीच आले हात जोडून की येऊ नका, येऊ नका असं सांगू लागले. त्यामुळे अशी संकटं आल्यानंतर आपलं नाणं खणखणीत असलं तर असल्या दडपशाहीला घाबरायचं काही कारण नाही. पण सध्याच्या विरोधकांनी कधी आयुष्यात संघर्षाला खऱ्या अर्थाने तोंड दिलेलंच नाही, त्यामुळे त्यांना असं वाटतं की त्यांच्यासारखीच इतर लोकही असतील परंतु तिथेच त्यांची फसगत झाली आहे.”

नव्या पिढ्यांमध्ये जाणीवपूर्वी धर्मवादाचा प्रसार करण्याचं काम काही लोक करतात. पण त्यांना यश येणार नाही. लोक दुर्लक्ष करतील आणि हा विषय सोडून देतील, असं माझं स्वच्छ मत आहे.” असं शरद पवारांनी सांगितलंय.

संपूर्ण देशातील लोकांवर वेगळा परिणाम करण्याच्या उद्देशानेच काश्मीर फाईल्स हा चित्रपट बनवण्यात आला. आणि खोटी स्थिती मांडलेला आहे. ज्या काळात काश्मीरी पंडिंतांच्या हत्या होत होत्या त्यावेळी देशात भाजपाच्या मदतीचं सरकार होतं. आजही त्या ठिकाणी जे घडतयं तेव्हाही आजही केंद्रात भाजपाचं सरकार आहे. केंद्रातील हे सरकार काश्मीरी पंडितांना संरक्षण देण्यासाठी पूर्णपणे ते अपयशी ठरले आहे, असा आरोपही शरद पवार यांनी केला आहे. तसेच, देशात काहीतरी चुकीचा विचार मांडून, प्रचार करून लोकांची मतं बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे, हेदेखील प्रत्येकाने जाणून घेतलं पाहिजे.” असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT