Political News : कसबा पोटनिवडणूक भाजपसह महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रचार, भेटीगाठी, मोर्चेबांधणी, रणनीती यांना उधाण आलं आहे. आधी पारंपारिक मतदारसंघ असताना कसब्याची निवडणूक सोपी वाटणारी निवडणूक दिवसेंदिवस अवघड होताना दिसत आहे. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मैदानात उतरले आहे. मात्र, आता जिल्हा प्रशासनाने निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करण्यासाठी सुसूत्रता येण्यासाठी निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना दरसूची जाहीर केली आहे.
कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा ४० लाख रुपये करण्यात आली आहे. निवडणूकीची खर्चाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला होता. मात्र, कोरोनानंतर सर्वत्र महागाई आणि मंदीची चर्चा सुरू असताना जिल्हा प्रशासनाने मात्र पोटनिवडणुकीसाठीच्या खर्चाचा हिशोब निश्चित करताना उमेदवारांना दिलासा दिला आहे.
राज्यात २०१९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ही मर्यादा २८ लाख रुपये होती. मात्र, आता खर्च मर्यादा वाढवल्यामुळे कसबा, चिंचवड पोटनिवडणुकी(Kasba - Chinchwad By Election) साठी उमेदवारांना मोठा फायदा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करण्यात सुसूत्रता येण्यासाठी निवडनुक रिंगणात असलेल्या उमेदवारांना दरसूची ठरवून दिली आहे. त्यानुसार उमेदवारांना खाद्य पदार्थ आणि प्रचार साहित्याचा खर्च दाखवावा लागतो. पोटनिवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला 40 लाख रुपये खर्च करण्यास मुभा दिली आहे.
जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या दरसूचीत शाकाहारी जेवण 81 रुपये, मांसाहारी जेवण 200 चहा 10, कॉफी 15, वडापाव 14रुपये असे कमी दर ठेवल्याने कार्यकर्त्यांमधील होऊ दे खर्च मागणीची वाढ होण्याची शक्यता आहे. पोहे, उपमा (12रुपये), साबुदाणा खिचडी (17 रुपये), पाण्याचा जार २० लि. (39रुपये),असे दरपत्रक लागू करण्यात आली आहे.
मागील काही वर्षात देशातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच गेल्या काही वर्षांमध्ये महागाईतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवावी, अशी मागणी अनेक राजकीय पक्षांनी केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ही खर्च मर्यादा वाढवण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेतला. मात्र, जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी परिणामी कमी पैशांत जादा वस्तू घेता येणार आहे. खर्च करणाऱ्या कार्यकर्त्यांची दमछाक टाळण्यास थोडी मदत होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रत्येक दिवसाचा केलेला खर्च उमेदवारांना सादर करावा लागतो. हा खर्च सादर करताना प्रचारासाठी वापरण्यात येणारा प्रत्येक साहित्याचा हिशोब निश्चित केलेल्या दरपत्रकाप्रमाणे उमेदवाराला द्यावा लागतो. प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या झेंंड्यापासून ते सभामंडप उभा राहण्यासाठी लागणाऱ्या साहित्य, वाहनं, प्रचार फेरी ,ढोलताशे, बँडपथक, फेटे पगडी, पुष्पगुच्छ, चहा, न्याहरी, जेवण, कापडी मंडप, फायबर प्लास्टिक खुर्ची, हारतुरे, फटाके, फेटा, झेंडा, छापील उपरणे, रिक्षा,बाटली बंद पाणी,फूड पॅकेट यांचा दरपत्रकामध्ये समावेश करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.