Maval Lok Sabha Constituency Politics : पुणे लोकसभा मतदारसंघानंतर आता मावळ लोकसभा मतदार संघासाठी आघाडीतील ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मावळ मतदारसंघावर दावा केल्याने या मुद्द्यावरुन ठाकरे गट आणि राष्ट्रवादी आमने-सामने येण्याची शक्यता आहे. (The key issue that will be a 'maval' in Mahavikas Aghadi: Displeasure in Shiv Sena with NCP's demand)
मिळालेल्या माहितीनुसार, आगामी पुणे (Pune Politics) लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (१ जून) राष्ट्रवादीची मुंबईत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटपात मावळ लोकसभा मतदारसंघ ' राष्ट्रवादी'कडे घ्यावा , अशी काही पदाधिकाऱ्यांनी मागणी केली. पण आतापर्यंत एकदाही राष्ट्रवादीला या जागेवर विजय मिळवता आला नाही. २००९ पासून शिवसेनेने मावळची जागा सातत्याने जिंकली आहे.
पहिल्यांदा गजानन बाबर आणि त्यानंतर विद्यमान खासदार श्रीरंग बारणे (MP Shrirang Barne) दोनदा मावळ मतदारसंघातून विजयी झाले. पण सध्या खासदार श्रीरंग बारणे शिंदे गटात आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचा मुलगा पार्थ यांना मावळमधून उमेदवारी देण्यात आली होती. पण बारणेंनी मोठ्या फरकाने पार्थ पवार यांच पराभव केला. यावेळीही मावळमधून पार्थ पवारांनाच (Parth Pawar) उमेदवारी देण्यात यावी, अशी काही पदाधिकाऱ्यांची मागणी आहे.
पण दुसरीकडे माजी मंत्री सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरs आणि मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्याही नावांची चर्चा आहे. श्रीरंग बारणे यांनी शिवसेनेचा गड कायम राखला होता. पण ते शिंदे गटात गेल्याने आणि आता ठाकरे गटाकडे सक्षम उमेदवार नाही, असा दावा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. पिंपरी आणि मावळ विधानसभा मतदारसंघात 'राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार आहेत. मावळ मतदारसंघात ठाकरे गटाची कोणतीही ताकद राहिली नाही.
राष्ट्रवादी ' चे उमेदवार नाना काटे यांना चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत लाखाहून अधिक मते होती. तसेच काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसची पुणे लोकसभा मतदारसंघात ताकद जास्त आहे, असा दावा अजित पवार यांनी केला होता. यावरुनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चढाओढ सुरु झाली आहे. पण पुणे लोकसभा मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार, याचा निर्णय महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते घेतील, असचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी स्पष्ट केल्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघावरूनही महाविकास आघाडीतील मतभेद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.