Mahavikas Aghadi News  Sarkarnama
पुणे

Mahavikas Aghadi News : आघाडी पुन्हा आवळणार 'वज्रमूठ'; सभेची तारीख अन् ठिकाणही ठरले : कर्नाटकने दिले बळ...

Mahavikas Aghadi Sabha News : कर्नाटक निवडणुकीतील विजयानंतर महाविकास आघाडीला पुन्हा बळ मिळाले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mahavikas Aghadi News : कर्नाटक निवडणुकीतील विजयानंतर महाविकास आघाडीला पुन्हा बळ मिळाले आहे. महाविकास आघाडीच्या थांबलेल्या 'वज्रमूठ' सभा आता पुन्हा होणार आहेत. पुण्यात आघाडीची सभा होणार आहे. त्या सभेची तारीखही ठरली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर आघाडीच्या सभांवर परिणाम झाला होता. मात्र, आता पवार यांनी राजीनामा मागे घेतला आहे. तसचे कर्नाटमध्ये काँग्रेसला ऐतिहासिक विजय मिळाला. त्यामुळे देशभरात विरोधी पक्षांना उर्जा मिळाली आहे. महाविकास आघाडीमध्येही काही मतभेद झाल्याची चर्चा होती. मात्र, ते मतभेद विसरुन आता पुन्हा एकदा आघाडी आपली 'वज्रमूठ' आवळणार आहे.

काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्यासह आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली होती. त्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले होते की ''उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन स्थगित करण्यात आलेली महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' सभा पुन्हा एकदा सुरू करणार असल्याची चर्चा बैठकीत करण्यात आली.''

''भविष्यात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी तिन्ही पक्षाचे प्रमुख आणि इतर घटक पक्ष बसून जागा वाटपाबाबत चर्चा करणार आहोत. याशिवाय महाविकास आघाडीचे एकत्रित संघटन व महाराष्ट्राला सक्षमपणे ठाम पर्याय देण्याचा प्रयत्न आघाडीचा असणार आहे. यावर एकमत आजच्या बैठकीत झाल्याचे'' जयंत पाटील यांनी स्पष्ट केले होते.

तसेच कर्नाटकच्या (Karnataka) मुख्यमंत्र्यांचा सत्कार पुण्यातील सभेमध्ये करण्यात येणार असल्याचेही काँग्रेसचे (congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले होते. त्यानंतर आता पुण्यातील 'वज्रमूठ' सभा 21 जून रोजी होणार आहे. या 'वज्रमूठ' सभेमध्ये राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखही उपस्थित राहणार आहेत, अशी माहीत त्यांनी आज (ता. 21) पुण्यात दिली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) पुन्हा एकदा राज्यभरात सभा घेणार आहे. या सभांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी करणार आहे. आघाडीमध्ये जागावाटपासून नेत्यांची वेगवेगळी वक्तव्य येत असताना पुन्हा एकदा सभा सुरु होणार आहेत. त्यामुळे आघाडीच्या कार्यकर्त्यांना काहीसा दिला मिळणार आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT