Pune News : भाजपकडून अखेरच्या क्षणापर्यंत कसबा आणि पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिंचवड, कसबा पोटनिवडणुका बिनविरोध करण्यासाठी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना साकडं घातलं होतं. त्यांनी पवारांनी पुढाकार घेऊन पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करावी, अशी विनंती केली होती.
तसेच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील नाना पटोलें(Nana Patole)नी कसब्याची निवडणूक बिनविरोध करावी लगेच रासनेंचा अर्ज मागे घेतो आणि टिळकांना उमेदवारी देतो असं जाहीर केलं होतं. पण राष्ट्रवादी काँग्रेसकडून चिंचवडच्या उमेदवार जाहीर झाल्यामुळे आता कसबा निवडणूक बिनविरोध होण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
कसबा पोटनिवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांनी आपला उमेदवारी जाहीर केला होता. यानंतर चिंचवडमध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवार अश्विनी जगताप यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा कालपर्यंत उमेदवार जाहीर झालेला नव्हता. यामुळे राष्ट्रवादीचे (NCP) नेते पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार संभ्रमात होते.
आता चिंचवडमध्ये राष्ट्रवादीकडून नाना काटे (Nana Kate) यांचं नाव निश्चित झालं आहे. त्यामुळे कसबा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता पूर्णपणे मावळली आहे. आणि आता दोन्हीही ठिकाणी जोरदार महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
बावनकुळे काय म्हणाले होते ?
अंधेरीच्या निवडणुकीवेळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुढाकार घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनामुळे उद्धव ठाकरे यांनी देखील निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाहन केले होते. त्यानंतर अंधेरीची निवडणूक बिनविरोध झाली होती.
शरद पवार यांना विनंती आहे की, जसे अंधेरीच्या निवडणुकीत पुढाकार घेतला, तसाच पुढाकार घेऊन चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करावी. चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती महाविकास आघाडीला आहे असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते.
तर कसब्यात रासनेंचा उमेदवारी अर्ज मागे घेऊ..
चंद्रकांत पाटलां(Chandrakant Patil)नी नाना पटोले यांच्या टिळकांच्या घरात उमेदवारी दिली असती तर आम्ही बिनविरोधचा विचार केला असता यावर मोठं विधान केलं होतं. यावर पाटील म्हणाले होते. माझे नाना पटोलेंना आवाहन आहे, टिळकांना उमेदवारी देतो, तुम्ही बिनविरोध करता का?" असा सवाल पाटलांनी पटोलेंना केला आहे. भाजपने चिंचवडमध्ये जगतापाच्या घरात उमेदवारी दिली आहे, त्याठिकाणी आघाडी उमेदवार देणार आहे, त्याचे काय ?'असे रोखठोक सवाल पाटलांनी उपस्थित केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.