Ramesh Bais News Update  Sarkarnama
पुणे

Ramesh Bais News Update : महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांना करावा लागणार या आव्हानांचा सामना...

झारखंडचे राज्यपाल रमेश बैंस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सरकारनामा ब्युरो

Nana Patole News: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्याला राष्ट्रपती भवनाने मंजुरी दिल्यानंतर झारखंडचे राज्यपाल रमेश बैंस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश बैस यांचा झारखंडमधील राज्यपालपदाचा कार्यकाळही वादात सापडला होता. राज्यपालांनी हेमंत सोरेन सरकारकडे अर्धा डझनहून अधिक वेळा सरकारच्या दूरदृष्टी आणि निर्णयांवर प्रश्न उपस्थित केल्याने दोघांमधील मतभेद अनेकदा टोकाला गेले आहेत.

हेमंत सोरेन आणि त्यांच्या पक्षाचे नेते अनेक प्रसंगी राज्यपालांना लक्ष्य करताना दिसले आहेत. राज्यपाल रमेश बैस यांच्यासाठी महाराष्ट्राची नवी जबाबदारी सोपी जाणार नाही.

आमदार मुद्दा रमेश बैस यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतो?

उद्धव ठाकरे सरकारच्या काळात राज्यपालांनी नियुक्त 12 आमदारांची नावे मंत्रिमंडळाच्या मान्यतेने राजभवनाकडे पाठवण्यात आली होती. मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यावर कोणताही निर्णय घेतला नाही. दुसरीकडे, एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने दिलेली यादी रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री कार्यालयाने राज्यपालांकडे केली.

मात्र, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या पत्रावर राजभवनाने कोणताही निर्णय घेतला नाही. नवीन राज्यपाल रमेश बैंस यांच्यासमोर राज्यपालांनी नियुक्त केलेल्या 12 आमदारांबाबतचा निर्णय हा सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे, जो राज्यपालांना अत्यंत नि:पक्षपातीपणे घ्यावा लागणार आहे.

भगतसिंग कोश्यारी आणि वाद?

2019 मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल बनले तेव्हापासूनच कोश्यारी वादात सापडले होते. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना शपथ देण्यात आली. अवघ्या 48 तासात फडणवीस सरकार पडले. राज्यपाल कोश्यारी यांनी अजित पवार यांच्यासोबत किती आमदार आहेत हे न तपासता शपथ दिली, असा आरोप करण्यात आला. राज्यपालांचा हा निर्णय पक्षपाती असल्याचे म्हटले होते. तेव्हापासून कोश्यारी यांचे उद्धव ठाकरेंच्या नव्या सरकारशी असलेले संबंधही वादाच्या भोवऱ्यात अडकले. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा वादही तसा ताजाच आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT