Pune Traffic Planning :
Pune Traffic Planning :  
पुणे

पुण्यातील वाहतुक कोंडी फुटणार; असे आहे नियोजन

सरकारनामा ब्युरो

Pune Traffic Planning | पुणे : पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या वाहतुक कोंडींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यात शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या बाजारपेठांमध्येही मोठी गर्दी जमल्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. दिवाळीच्या खरेदीसाठी गर्दी करत असल्याने पुण्यातले रस्त्यांवर मोठी वाहतुक कोंडी होत आहे.

या वाहतुक कोंडींच्या समस्येसाठी शहरातील सर्व पक्षीय पुढाऱ्यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली होती. पण पुढार्‍यांना आश्वासन देऊनही वाहतूक कोंडी सुटली नाही. त्यामुळे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर टीका ही होऊ लागली होती. त्यानंतर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वाहतूक उपायुक्त राहूल श्रीरामे यांची वाहतूक कोंडी आणि वाहतुकीच्या गलथान कारभारामुळे तडकाफडकी उचलबांगडी केली. त्यानंतर वाहतुकीच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी सायबर डिसीपी भाग्यश्री नवटके यांची नियुक्ती केली आहे. तसेच, वाहतूककोंडी सोडविण्यासाठी आणखी तीनशे अतिरिक्त कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती केली आहे.

असे आहे नियोजन

नागरिकांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, शहराच्या मध्यवर्ती भागात सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

शहरातील मध्यवर्ती भागातील शिवाजी रोड, जंगली महाराज रोड

कर्वेरोड : खंडुजीबाबा चौक ते वनदेवी चौक

पौड रोड: पौड फाट्यापासून ते चांदणी चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड, गणेश रोड, लक्ष्मी रोड, जंगली महाराज रोड, टिळक रोड, लालबहादूर शास्त्री रोड, केळकर रोड, कुमठेकर रोड, बाजीराव रोड, यासोबतच पुरम चौकापासून सिमला ऑफिस चौकापर्यंत जड वाहनांना बंदी असेल.

सोलापूर रस्ता : भैराबा नाला चौकापासून सारसबागेपर्यंत

पुणे छावणीतील आंबेडकर रस्ता सुभाषचंद्र बोस चौक ते आंबेडकर पुतळा, कॅम्प,

महात्मा गांधी रोड : गोळीबार मैदान चौकापासून ते आंबेडकर पुतळ्यापर्यंत,

कॅम्प, इस्ट स्ट्रीट : खान्यामारुती चौकापासून ते इंदिरा गांधी चौक, लष्कर,

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT