Rajesh Patil Trasfer| 
पुणे

पुण्यासाठी दीड महिना पाटलांनी वाट पाहिली अन अखेर तेथेच बदली झाली

Rajesh Patil Trasfer| राज्य पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पाटील यांना मुंबईत पाठवण्यात आले होते.

उत्तम कुटे: सरकारनामा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कार्यक्षम आयुक्त राजेश पाटील यांची गेल्या महिन्यात १६ तारखेला राज्य सरकारने एमडी, एमटीडीसी,मुंबई अशी मुदतपूर्व बदली केली होती. राज्यात सत्ताबदल होऊन शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकार येताच महाविकास आघा़डी सरकार व त्यातही तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणलेले पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली होती. पवारांना शह देण्याचा उद्देश त्यामागे होता.

राज्य पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पाटील यांना मुंबईत पाठवण्यात आले होते. मात्र,ही बदली त्यांना पसंत नव्हती. त्यांना पुण्यातच रहायचे होते. म्हणून ते नव्या ठिकाणी दीड महिना झाला, तरी हजर झाले नव्हते. बदलीत बदल करावा म्हणून त्यांचे प्रयत्न सुरु होते. त्याला अखेर यश आले. त्यांची एमडी, एमटीडीसी अशी मुंबईत झालेली बदली आज राज्य सरकारने रद्द केली.

एवढेच नाही,तर त्यांच्या इच्छेनुसार त्यांना पुण्यातच ठेवण्यात आले आहे. मात्र,ते करताना त्यांना संचालक,सैनिक कल्याण अशी काहीशी साइड पोस्टिंग देण्यात आली आहे. पाटील यांच्यासह राज्यातील ४४ ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या राज्य सरकारने आज बदल्या केल्या. त्यात इतरांच्या बदल्यांबरोबर पाटील यांच्या बदली आदेश दुरुस्ती तथा बदलाचाही समावेश आहे.आपल्या कारभारामुळे प्रत्येक सरकारच्या निशाण्यावर राहिलेले निर्भीड व तडफदार तुकाराम मुंडे या ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांना पुन्हा साईड पोस्टिंग (एफ डब्ल्यू आयुक्त आणि एनएचएम संचालक,मुंबई)देण्यात आली आहे. त्यांनी आतापर्यंत कुठेही आपली टर्म सहसा पूर्ण केलेली नाही. मुदत पूर्ण होण्याअगोदरच त्यांनी उचलबांगडी केली जात आहे.

दरम्यान, आयएएसनतंर आता आयपीएस अधिकाऱ्यांच्याही बदल्या येत्या काही दिवसांत होणार आहेत.त्यात `मविआ` च्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या जागी आपले अधिकारी राज्यातील नवे सरकार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणण्याच्या हालचाली आता सुरु झाल्या आहेत. त्यासाठी मुदत पुर्ण झाल्याचे कारण देण्यात येणार आहे.पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचाही या बदली होणाऱ्या २३ ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीत समावेश आहे.पण, त्यांच्याजागी कोण येणार हे अद्याप कळू शकलेले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT