Bhagat Singh Koshyari, Narayan Rane News
Bhagat Singh Koshyari, Narayan Rane News Sarkarnama
पुणे

Narayan Rane News : राज्यपाल कोश्यारी जाणार; नारायण राणे राज्यपाल होणार?

उमेश घोंगडे

Bhagat Singh Koshyari News : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या गेल्या सहा महिन्यातील काही आक्षेपार्ह वक्तव्यावरून त्यांच्या विरोधात राज्यातल्या विरोधकांनी रान उठवलं होतं. या पार्श्वभूमीवर स्वतः राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्याला पदमुक्त करावं अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे यापूर्वी दोनदा व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लवकरच महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून मुक्त करण्यात येणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितलं. कोश्यारी यांच्याजागी लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन (Sumitra Mahajan), पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग किवा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या नावाची प्रामुख्याने चर्चा आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना राज्यपाल करण्यात येणार असल्याचेही या सूत्रांनी सांगितले. मात्र, राणे यांची राज्यपाल म्हणून होणारी नियुक्ती महाराष्ट्रात नव्हे, तर इतर कोणत्याही राज्यात होऊ शकते, असी माहिती आहे.

कोश्यारी यांना पदावरून हटवण्यात यावे या मागणीसाठी राज्यातल्या विरोधकांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली आहे. राज्यपालांना हटविण्यात यावे अशी मागणी विरोधकांनी अनेकवेळा केंद्र सरकारकडे केली आहे. विरोधकांची मागणी होत असताना केंद्राने या संदर्भात कोणतीही हालचाल केलेली नाही. आता विरोधकांची मागणी शांत झाल्यानंतर कोश्यारी यांना हटवून त्यांच्या जागी नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सूत्रानी सांगितले.

दरम्यान, एका कार्यक्रमात बोलताना मला महाराष्ट्राचे पाल व्हायला आवडेल, असे सुमित्रा महाजन म्हणाल्या होत्या. त्यामुळे त्यांचीही महाराष्ट्राचे राज्यपाल होण्याची इच्छा आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा अधिक आहे. मात्र, बी. एस. येडियुरप्पा, कॅप्टन अमरिंदरसिंग आणि सुमित्रा महाजन यांच्यापैकी एका नेत्यावर महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जबाबदारी येणार असल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT