Diwali Sarkarnama
पुणे

पुण्यात फटाक्‍यांबाबत होऊ शकतो हा निर्णय

योग्य ते निर्बंध घालून फटाक्‍यांना परवानगी दिली जाईल. त्याबाबतचा आदेश मंगळवारी निघू शकतो.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : कोरोनाचे निर्बंध कमी होत असताना पुण्यात दिवाळीत फटाक्यांना परवानगी मिळण्याची शक्यता दिसू लागली असून येत्या दोन दिवसात याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.

गेल्यार्वी कोरोनाच्या सावटात फटाक्यांना परवानगी देण्यात आली नव्हती. परिणामी फटाक्याच्या बाजारपेठेला मोठा फटका बसला आहे. गेल्या महिनाभरात कोरोनाचे रूग्ण कमी झाले आहेत. पुण्यातील बहुतांश व्यवहार सुरळित होत असताना पटाक्यांना परवानगी मिळावी, अशी मागणी होत आहे. या पाश्‍र्वभूमीवर उद्या किंवा परवा याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

शहराला मागील एक ते दिड वर्षांपासून कोरोनाचा मोठा फटका बसला. नागरीकांना अनेक सणसमारंभ निर्बंधाखाली साजरे करावे लागत होते. आता मात्र हे चित्र बदलू लागले आहे. काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रामध्ये समाधानकारक वातावरण तयार होऊ लागले आहे. त्यातच दिवाळी सण आल्याने नागरीकांचा आनंदही द्विगुणीत झाला आहे. मागील वर्षी दिवाळी साजरी करताना नागरीकांना फटाके उडविण्यावर मर्यादा होत्या. यंदाही असे निर्बंध असणार का ? असा नागरीकांचा प्रश्‍न होता.

राज्यातील काही महापालिकांनी फटाक्‍यांना परवानगी दिली. परंतु पुण्यात परवानगी देण्यात आली नव्हती. महापालिका व पोलिस प्रशासन फटाक्‍यांना परवानगी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची शक्‍यता आहे. त्याबाबत मंगळवारी महापालिका व पोलिस प्रशासनाकडून आदेश काढला जाण्याची शक्‍यता आहे.

याविषयी पोलीस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे म्हणाले, ""फटाक्‍यांबाबत परवानी देण्याविषयी आमची महापालिकेबरोबर चर्चा सुरू आहे. योग्य ते निर्बंध घालून फटाक्‍यांना परवानगी दिली जाईल. त्याबाबतचा आदेश मंगळवारी निघू शकतो.''

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT