Rohit Pawar  Sarkarnama
पुणे

Rohit Pawar News : हे सरकार बदला घेण्यासाठी..; रोहित पवारांनी करुन दिली फडणवीसांच्या 'त्या' विधानाची आठवण

याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बदला घेण्याच्या त्या विधानावर लक्ष वेधलं.

रोहिदास गाडगे

Rohit Pawar News : 'शिंदे फडणवीस सरकार लोक हितासाठी नाही तर बदला घेण्यासाठी आलेले सरकार आहे. ज्यांच्याकडे लोकहित नसतं ते कधीच आपला विचार करणारं नाही. येत्या 2024 ला महाराष्ट्रात बदल होणारच, आणि लोकांच्या विचाराचं सरकार महाराष्ट्रात येणारच, असा विश्वास राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. रोहित पवार खेड तालुक्यातील जनजीवन मिशन पाणी योजनेच्या कार्यक्रमात चाकण येथे बोलत होते.

याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बदला घेण्याच्या त्या विधानावर लक्ष वेधलं. भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपुर्वी एका सभेत जाहीरपणे म्हटलं होतं. आम्हाला बदला घ्यायचा होता, म्हणून आम्ही शिवसेना फोडली आणि आमचं सरकार स्थापन केलं. ज्यात व्यक्तिगत हित असतं आणि लोकांच हित नसतं ते सरकार आपला कधीच विचार करत नाही. अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

यावेळी आपल्या कुटुंबावर आणि महाराष्ट्रावर कोणी बोललं तर तुम्ही शांत बसता का? असा सवाल उपस्थित केला. पण छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करण्यात आली. त्याला आपण विरोध केला, तुम्ही विरोध केला पण भाजपा आणि शिंदे गटातील नेत्यांनी साफपणे याकडे दुर्लक्ष केलं. पण स्वत:च्या हितासाठी आणि 40 आमदारांना खुष करण्यासाठी यांना सत्ता हवी होती, असा घणाघात आरोपही रोहित पवारांनी केला.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होत असताना जगतापांच्या विरोधात रोष नाही. मात्र भाजपाच्या विरोधात रोष असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस विजय सहज होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अश्विनी जगताप यांच्याबाबत रोहित पवारांनी सहानुभुती व्यक्त केली. चिंचवड पोटनिवडणूकीच्या रिंगणात शिवसेनच्या राहुल कलाटेंनी बंडखोरी करत मोठं आव्हान उभं केलं असताना शिवसेना चिंचवडमध्ये बंडखोरी करत नाही तर त्यांच्या एक नेत्याने बंडखोरी केल्याचे रोहित पवारांनी स्पष्ट केलं. तसेच, राष्ट्रवादी कॉग्रेसचा विजय निश्चित असल्याचे रोहित पवारांनी संकेत दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT