Vasant More News : पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे (Vasant More) पुन्हा एकदा नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. पुण्यात आयोजित केलेल्या मनसेच्या एका कार्यक्रमात बोलू न दिल्यामुळे ते नाराज झाले, असल्यचे म्हटले जात आहे. यापूर्वीही त्यांच्या नाराजीमुळे मनसेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.
मात्र, मोरे यांच्या नाराजीच्या चर्चांनंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षात येण्याचे निमंत्रनही दिले होते. मात्र, मोरे यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. मनसेच्या (MNS) वतीने डावले जात असतानाही, मोरे यांनी पक्ष का सोडला नाही? असा सवाल विचारला जात आहे.
वसंत मोरे हे २००२ पासून शिवसेनेत (Shivsena) सक्रीय होते. २००६ मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर मोरेंही शिवसेना जय महाराष्ट्र करत ठाकरे यांना साथ दिली. मनसेच्या स्थापने पासून मोरे, राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. 2007 मध्ये मोरेंनी पहिल्यांदा मनसेच्या तिकीटावरुन नगरसेवकपदासाठी निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर पुण्यामध्ये मनसे म्हटले की वसंत मोरे यांचे नाव घेतले जात होते.
आपल्या कामांमुळे पुण्याच्या राजकारणात मोरे नावारुपास आले. त्यांची आंदोलने सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करुन सोडत होती. मात्र, राज ठाकरे यांनी मशिदिवरील भोंग्यांविरोधात आंदोलन पुकारले आणि तिथेच माशी शिंकली. मोरेंनी वेगळी भूमिका घेतली, आणि ठाकरेंची नाराजी ओढवून घेतली. त्यानंतर त्यांचे शहराध्यक्षपद गेले आणि पुण्यातील मनसे संघटना आणि मोरे यांच्यात अंतर पडत गेले. ते अंतर आता वाढत गेले आहे.
मात्र, तरीही मोरे यांनी पक्ष सोडण्याची भूमिका अजून तरी घेतलेली नाही. याबाबत मोरे म्हणतात, "सगळ्या पक्षांकडून ऑफर आहेत. पण इथे पहिल्या पासूनच्या वेव्हलाईन जुळलेल्या आहेत. त्यामुळे पक्ष सोडावा असे वाटत नाही. मात्र, काही लोकांना वाटतंय की मी मनसे सोडावी. मला पार दारापर्यंत नेऊन ठेवलयं. आता फक्त ढकलायचं बाकी आहे, अशी नाराजीही ते व्यक्त करतात. मात्र, पहिल्यापासून मनसेत असल्यामुळे येथे वेव्हलाईन जुळ्याचेही ते सांगतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.