Pune Fake HSC SSC Certificate
Pune Fake HSC SSC Certificate sarkarnama
पुणे

Pune Fake HSC SSC Certificate : पुण्यातील बोगस प्रमाणपत्र वाटप प्रकरणी 'ही'अपडेट; पोलिसांची मोठी कारवाई

सरकारनामा ब्यूरो

Pune : राज्यातील टीईटी घोटाळ्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात अनेक शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्रे (Bogus Certificate) सादर करत ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दावा करत नोकरी मिळवली होती. या प्रकरणानंतर दहावी, बारावीचे बनावट प्रमाणपत्र देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. बनावट वेबसाईटव्दारे विद्यार्थ्यांना बोगस प्रमाणपत्र दिली जात असल्याचा प्रकार पुणे पोलिसांनी समोर आणल्यामुळे केला आहे. आता या प्रकरणी नवीन अपडेट समोर आली आहे.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून बोगस प्रमाणपत्र (Bogus Certificate)वाटणाऱ्या आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. जमाल शेख, महेश विश्वकर्मा असे अटक केलेल्या आरोपी एजंटांची नावे आहेत. महेश विश्वकर्मा होमगार्डच्या सेवेत असून त्याने आत्तापर्यंत 35 प्रमाणपत्र वाटल्याचं निष्पन्न झालं आहे तर जमाल शेखने आठ प्रमाणपत्र वाटले आहे. यातील मुख्य आरोपीने राज्यात १५ एजेंट नेमले होते. यापूर्वी पोलिसांनी कृष्णा सोनाजी गिरी, अल्ताफ शेख व सय्यद इम्रान यांना अटक केली आहे.

पुण्यात नापास तरुणांना दहावी बोर्डाचे बोगस प्रमाणपत्र(Fake HSC SSC Certificate) देणारी टोळी कार्यरत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या टोळीने महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल नावाची वेबसाइट २०१९ मध्ये तयार केली होती. सुरुवातीला ३५ जणांना प्रमाणपत्र दिले. त्यानंतर ७०० जणांना अशी प्रमाणपत्र दिल्याचे समोर आलं होतं. दहावीच्या बोर्डाचे सर्टिफिकेटबरोबर मार्कशीट आणि स्कूल ट्रान्सफर सर्टिफिकेट देत होते. यातील मुख्य आरोपीने राज्यात १५ एजेंट नेमले होते. संदीप कांबळे एजंट म्हणून काम करत होता. एका प्रमाणपत्रासाठी ते ३५ ते ५० हजार रुपये घेत होते.

कसा उघड झाला प्रकार ?

दहावी, बारावीत नापास झालेल्यांना बनावट प्रमाणपत्र दिले जात असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी बनावट ग्राहक तयार करुन संदीप कांबळे यांच्याशी संपर्क साधला. त्याने ६० हजार रुपयांमध्ये प्रमाणपत्र मिळेल असे सांगितले. बनावट ग्राहकाने काही रक्कम त्याला दिली व उर्वरित रक्कम घेण्यासाठी आला असताना पोलिसांनी (Pune Police)सापळा रचून पकडले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT