आंबेठाण (जि. पुणे) : सध्या सुरू असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या (Gram Panchayat Election) रणधुमाळीत खेड तालुक्यात (Khed) कोरेगाव खुर्द गावच्या एका महिला उमेदवाराला उमेदवारी अर्ज भरण्यास मज्जाव करून दमदाटी करण्यात आली. त्यामुळे गावचे राजकारण चांगलेच तापले आहे. दमदाटी करण्यासाठी बाहेरून गुंड प्रवृत्तीचे तरुण आणल्याने निवडणूक शांततेत आणि निःपक्षपातीपणे पार पडणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. गावात ४० ते ५० तरुणांचे टोळके अशी दहशत निर्माण करीत असल्याने प्रशासन नक्की काय करते? असा सवाल उपस्थित होत आहे. (Threat to a woman who came to fill the nomination form in Khed)
सध्या कोरेगाव खुर्द ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून उद्या ( शुक्रवारी, ता. २ डिसेंबर) शेवटचा दिवस आहे. परंतु बुधवारी (ता. ३० नोव्हेंबर) कोरेगाव खुर्द या गावातील एक महिला उमेदवार आपल्या समर्थकांसह अर्ज भरण्यासाठी तालुक्याचे ठिकाण असलेल्या राजगुरूनगर येथे गेली होती. त्या वेळी एकाने या महिला उमेदवाराला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अर्ज भरू नको, आमच्या उमेदवाराला बिनविरोध द्या; अन्यथा परिणाम वाईट होतील, अशी धमकी दिली. त्यामुळे भेदरलेल्या या उमेदवाराने बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.
सध्या अर्ज कोणी भरायचा किंवा कोणाला प्रथम संधी द्यायची, यावर दोन्ही गटात चर्चा सुरू झाली आहे. यावर मार्ग निघेलही. पण, तरुणांचे टोळके महिला उमेदवाराला तालुक्याच्या ठिकाणी धमकी देत असेल तर खरंच कायदा आणि सुव्यवस्था राहिली का? असा प्रश्न निर्माण हेात आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीमुळे गावगावड्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. निवडणून येण्यासाठी अनेकांकडून साम, दाम, दंड भेद नीतीचा वापर केला जात असल्याचे खेड तालुक्यातील या घटनेवरून दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.