Crime News, Pimpri-Chinchwad
Crime News, Pimpri-Chinchwad  Sarkarnama
पुणे

महाराष्ट्र बँकेतील दोन कोटींच्या रोकडावर डल्ला मारणारे तीन जण ताब्यात!

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पैशांच्या हव्यासामुळे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये कार्यरत असणाऱ्या उपव्यवस्थापकानेच आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे. पदाचा गैरवापर करून तब्बल दोन कोटी रूपयांची रोख रक्कम आपल्या साथीदारांच्या साहाय्याने एका कंपनीला देण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे.

संबंधित कंपनीकडून चॅरिटेबल संस्थेच्या नावे अधिकची देणगी मिळवून, पैसे तिघांमध्ये वाटून घेणे, तिघांच्या अंगलट आले. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट-4 ने तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून दोन कोटींची रोख रक्कम जप्त केली आहे. बनावट नोटांची बातमी मिळाल्यानंतर कारवाई दरम्यान हा प्रकार उघडकीस आला.

काळ्याचे पांढरे करायला आले असताना, तिघे पोलिसांच्या जाळ्यात अडकले. अमोल गोरखनाथ कंचार (वय 45, रा. औरंगाबाद), संतोष वैजनाथ महाजन (वय 43, रा. नाशिक) आणि सुशील सुरेश रावले (वय 34, रा. मंचर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. रावले आणि कंचार हे मावसभाऊ आहेत, तर महाजन हा त्यांचा मित्र आहे.

आरोपी सुशील रावले हा (बँक ऑफ महाराष्ट्र, मंचर करन्सी चेस्ट, ता. आंबेगाव) येथे डेप्युटी मॅनेजर आहे. त्याने मंचर करन्सी चेस्टमधून दोन कोटींची रक्कम अनधिकृतपणे ताब्यात घेतली. रोकड एका खासगी कंपनीला देऊन त्यांच्याकडून सीएसआरची मोठी रक्कम अमोलच्या चॅरिटेबल ट्रस्टच्या खात्यात घेणार होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT