Nana Kate Console Pranit Vankar Sarkarnama
पुणे

Samruddhi Mahamarg Accident : बुलढाण्यातील अपघातात पिंपरी-चिंचवडमधील वाणकर कुटुंबातील तीन महिलांचा मृत्यू

Pimpri Chinchwad Three Died In Samruddhi Buldana Accident : मृतदेहांची ओळखही पटवता येणे अवघड

सरकारनामा ब्यूरो

Pimpri Chinchwad Three Died In Buldhana Accident : समृद्धी महामार्गावर शनिवारी (ता. १ जुलै) एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर आठ जण जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर राज्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेतील मृतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आदींसह सर्व नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. (Latest Marathi News)

बुलढ्याण्यातील समृद्धी महामार्गावर घडलेल्या या अपघातात पिंपरी-चिंचवडमधील तीन जणांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना काटे यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार वाणकर कुटुंबातील तीन महिलांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिचंवड शहरावर शोककळा पसरली आहे.

बुलढाण्यातील बस अपघातात पिंपरी-चिंचवडमधील शोभा वाणकर, वृषाली वाणकर आणि ओवी वाणकर यांचा मृत्यू झाला आहे. नाना काटे यांनी म्हटले आहे की,"बातम्यांच्या माध्यमातून बस अपघाताची माहिती मिळाली. या अपघात रहाटणी पिंपळे सौदागर येथील माझे सहकारी प्रणित वाणकर यांच्या आई, पत्नी आणि मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बातमी पाहताना वाटलेही नव्हते की या अपघातात कुणी जवळच्या व्यक्ती असतील. हा अपघात खूपच भीषण आहे. त्यामुळे मृतदेहाची ओळखही पटवणे अवघड आहे असे प्रणित यांनी मला सांगितले. त्यांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. "

दरम्यान, अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांचे मृतदेह प्रमाणात भाजले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख पटविण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे मृतांच्या कुटुंबियांशी चर्चा करून रविवारी बुलडाण्यातच त्यांच्यावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत बुलडाणा येथे गेलेले वर्ध्याचे तहसीलदार रमेश कोळपे यांनी ही माहिती दिली.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT