Pooja Khedkar- Dilip Khedkar Sarkarnama
पुणे

Pooja Khedkar: पूजा खेडकर कुटुंबाचा बारामतीत आणखी एक प्रताप; सातबारावर 'धोंडीबा'चे केले 'कोंडीबा'

Mangesh Mahale

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांचे वडील दिलीप खेडकर यांनी केलेला आणखी एक कारनामा समोर आला आहे. सातबाऱ्यावर त्यांनी आपल्या वडिलांचे नाव बदलले असल्याची माहिती समोर आली आहे.

दिलीप धोंडीबा खेडकर ऐवजी आता नवीन नाव दिलीप कोंडीबा खेडकर असा बदल केला आहे. लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे दिलीप खेडकर दोनदा निलंबित झाले होते.तसेच गेल्या वर्षी खेडकर यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संचालक असताना सक्तीची निवृत्ती घेण्यास सांगण्यात आले असल्याचेही समोर आले आहे.

दिलीप खेडकर यांनी बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे असलेल्या 14 गुंठे जमिनीच्या सातबारातील आपल्या नावातील वडिलांचे नाव बदलले आहे.

14 वर्षांपूर्वी दिलीप कोंडीबा खेडकर यांनी ही जमीन खरेदी केली आहे, त्याचा सातबारा ही उपलब्ध आहे. वागळवाडी येथे दिलीप खेडकर यांची 14 गुंठे जमीन असल्याची माहिती पुण्याचे आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिली होती.

ही जमीन विक्री करायची असल्याने त्या ठिकाणी खेडकर कुटुंबीयांनी तसा बोर्ड लावला आहे. दीड कोटी जमिनीची किंमत असल्याचे सांगितले जात आहे. आता सातबारावर नव्याने 'कोंडीबा' असा बदल केला आहे.

बनावट प्रमाणपत्राच्या वादात अडकलेल्या पूजा खेडकर यांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे. गेल्या काही दिवस नॉट रिचेबल असलेल्या पूजा खेडकर यांना चौकशीसाठी मसुरीच्या प्रशिक्षण केंद्रात बोलवण्यात आलं होतं. मात्र, त्या चौकशीसाठी गैरहजर राहिल्या आहेत.

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयाकडून मिळवलेल्या अपंगत्वाच्या दाखल्या बाबत खुलासा वजा चौकशी अहवाल आज सादर केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे हे आज महापालिका प्रशासक शेखर सिंह यांना त्यांनी तयार केलेला चौकशी अहवाल सादर करतील.

पूजा खेडकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयातून अपंगत्वाचा दाखला मिळवला होता, हा दाखला मिळवण्यासाठी खेडकर यांनी खोटी कागदपत्र दिल्याबाबत आणि वाय सी एम रुग्णालयाने दिलेला अपंगत्वाचा दाखला नियमबाह्य पद्धतीने दिला असल्याचे आरोप झाल्यानंतरदिव्यांग कल्याण मंत्रालयाने चौकशीचे आदेश दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT