Kasba By-Poll Election : Girish Bapat
Kasba By-Poll Election : Girish Bapat Sarkarnama
पुणे

Kasba By-Election : नाकात नळ्या, ऑक्सिजन सिलेंडर, व्हिल चेअर : आजारी असतानाही बापटांनी बजावला मतदानाचा हक्क!

सरकारनामा ब्यूरो

Kasba By-Election : भाजपचे ज्येष्ठ नेते व पुण्याचे खासदार कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहचेले. गिरीश बापट (Girish Bapat) हे मागील काही दिवसांपासून आजारी असून ते उपचार घेत आहेत. नाकात नळ्या, ऑक्सिजन सिलेंडर, व्हिल चेअरवर असतानाही त्यांनी आजारपण अडथळा ठरू न देता, त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

आजारी असतानाही त्यांनी कसब्याचे भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी पत्रकार परिषद घेतली होती. भाजपच्या प्रचारादरम्यान बापट यांनी आजारी असून स्वतः मैदानात उतरून पदाधिकारी यांच्यासाठी मेळावा घेतला होता. यावर राजकीय संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यानंतर ते आपला मतदानाचा हक्कं बजावण्यासाठी ते मतदान केंद्रावर दाखल झाले आणि आपला मतदानाचा हक्क बजावला.

शेवटचे काही मिनिटे बाकी असताना, गिरीश बापट मतदानासाठी केंद्रावर आले. गिरीश बापट यांनी मतदान केले. आज कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. आजारी असताना सुद्धा गिरीश बापट यांनी मतदानाला हजेरी लावत आपले कर्तव्य बजावले. यासाठी आज पाच वाजण्याच्या सुमारास अहिल्यादेवी शाळेच्या मतदान केंद्रावर ते पोहोचले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT