Sushma Andhare  Sarkarnama
पुणे

Sushma Andhare News: मुंढेंची नियुक्ती, भीमनवार सक्तीच्या रजेवर...तरीही सुषमा अंधारे म्हणतात, 'युद्धात जिंकलो अन् तहात हरलो...'

Uddhav Thackeray Shivsena News: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोमवारी (ता.12 ऑक्टोबर) पुण्यात पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलन मागे घेण्याच्या निर्णयावरही रोखठोक भाष्य केलं.

Deepak Kulkarni

Pune News: पुण्यात गेल्या 11 दिवसांपासून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. अखेर रविवारी मध्यरात्री हे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली.राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आंदोलनस्थळी जाऊन सरकारने आंदोलक विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. मात्र, याच आंदोलनावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तडफदार नेत्या सुषमा अंधारे यांनी धक्कादायक दावा केला आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोमवारी (ता.12 ऑक्टोबर) पुण्यात पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलन मागे घेण्याच्या निर्णयावरही रोखठोक भाष्य केलं. त्या म्हणाल्या,या आंदोलकांच्या हातात काहीही पडलेलं नाही, युद्धात जिंकलो, पण तहात हरलो अशीच परिस्थिती झाली,असं अंधारे यांनी म्हटलं.

त्या म्हणाल्या, विक्रम पाचपुते जे एक विधिमंडळ सदस्य आहेत,कुणी ऐरागैरा माणूस नाही,अशा एका जबाबदार व्यक्तीची एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना अगदी अर्बन नक्षल म्हणण्यापर्यंत हिंमत झाली. ते विधान परतही घेतले गेले नाही. मग हे आंदोलन यशस्वी कसं झालं, ते यशस्वी झालं नाही असा धक्कादायक विधाही सुषमा अंधारे यांनी केलं.

एमपीएससीच्या आंदोलनातून जी पोरं आंदोलनातून समोर आली आहे,त्यांना उद्या सरकारकडून सुडबुद्धीनं वागवलं जाणार नाही, हे केशावरुन असा प्रश्नही शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. ही आंदोलनातील पोरं उद्या पास झाली, तर सरकार उद्या त्यांना सेवेत सामावून घेईल का? अशी विचारणाही त्यांनी केली.

सरकारला पदवीधर निवडणुकीत आंदोलनाचा फटका बसू नये म्हणून ही तात्पुरती सारवासारव करण्यात आली आहे. सरकारने विद्यार्थ्यांची फक्त दिशाभूल केली नाही, सरकारने विद्यार्थ्यांसोबत क्रूर चेष्टा केली असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. जी पोर सरकारला विरोध करत होती, ती सरकारच्या गोपनीय अहवालात कायमची लिहिली जातील असंही त्यांनी म्हटलं.

एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा ही आंदोलनातील प्रमुख मागणी होती पण राजीनामा झालाच नाही. राजीनामा तर फार दूरची गोष्ट आहे.साधी दिलगिरीही व्यक्त झाली नाही. सरकारने जर विवेक भीमनवर यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं असतं, तर त्याचं ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं असतं. मात्र, विवेक भीमनवार यांनी सक्तीच्या रजेवर जात असल्याचं ट्विट का केलं? असा महत्त्वाचा मुद्दाही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

सुषमा अंधारे यांनी या पत्रकार परिषदेत आंदोलनातील महत्वाच्या मागण्यांवर बोलणं झालं नसल्याचाही दावा केला आहे. तसेच पेपरफुटी झाली तर कुणावर तरी कारवाई झाली पाहिजे. आयोगाने जे अनेक घोळ घातले आहेत. ते कोण स्वीकारणार आहे? जे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे त्याला जबाबदार कोण? असे एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली. विवेक भिमनवार स्वतः हवा पालटीसाठी बाजूला गेले आहेत. या आंदोलनाती विद्यार्थ्यांच्या हाती नेमकं काय लागले? असा सवाल अंधारेंनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT