Santosh Jagtap  Sarkarnama
पुणे

गोळीबार करून संतोष जगतापचा खून करणाऱ्या दोघांना ३० तासांत पकडले

त्यांच्याकडून अग्नीशस्त्रे आणि वाहन जप्त केल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे

सरकारनामा ब्यूरो

उरुळी कांचन (जि. पुणे) : वाळू व्यावसायिक संतोष संपत जगताप (वय ३८, रा. राहू, ता. दौंड) याच्यासह दोघांचा दिवसाढवळ्या गोळ्या घालून खून करणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांनी अवघ्या 30 तासाच्या आत इंदापुरातून ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. याला पुणे शहर पोलिसांनी दुजोरा दिला आहे. (Two accused in the murder of sand trader Santosh Jagtap were arrested in Indapur)

पंकज मिसाळ, नन्या आदलिंग असे ताब्यात घेतलेल्यांची नावे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. उरुळी कांचन येथे सोनाई हॉटेलसमोर शुक्रवारी (ता. 22 ऑक्टोबर) दुपारी संतोष जगताप याच्यावर गोळीबार झाला होता. त्यात राहू (ता. दौंड) येथील संतोष संपत जगताप (वय ३८) व स्वागत बाप्पू खैरे (वय २५, रा. दत्तवाडी, उरुळी कांचन) हे मृत्यूमुखी पडले आहेत. तर, जगताप याचे दोन अंगरक्षक शैलेंद्रसिंग रामबहादूर सिंग (वय ४३) व मोनुसिंग (वय ४०) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

जखमी अवस्थेतही संतोष जगताप ह्याने प्रत्युत्तरात गोळीबार केला होता. त्यात स्वप्नील खैरेचा मृत्यू झाला होता. संतोष जगतापवर भरदिवसा गोळीबार करणार्‍याचा शोध पुणे पोलिस घेत होते. दरम्यान, आरोपींबाबत गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इंदापूर जवळून दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून अग्नीशस्त्रे आणि वाहन जप्त केल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. इतर फरार आरोपींचा पुणे पोलिस शोध घेत आहेत.

जगताप आणि खैरे यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची असून, जगताप हा सन २०११च्या दुहेरी खुनातील आरोपी असून, त्याच्यावर एकूण ८ गुन्हे दाखल आहेत. तर, खैरे हा सन २०१२ मधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. पोलीसांना घटनास्थळी १ पिस्तूल, १ जिवंत काडतूस व ४ पुंगळ्या मिळून आल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT