Gunratan  Sadavarte
Gunratan Sadavarte  sarkarnama
पुणे

गुणरत्न सदावर्तेंची दोन तास चौकशी; मराठा क्रांती मोर्चाकडून घोषणाबाजी

सरकारनामा ब्यूरो

पुणे : एसटी कामगार संघटनेच्या आंदोलनातील नेते ॲड. गुणरत्न सदावर्ते (Gunratan Sadavarte) यांची आज (ता.5 मे) सलग दुसऱ्या दिवशी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Pune Police) एका गुन्ह्यासंदर्भात चौकशी केली. दरम्यान, या वेळी मराठा क्रांती मोर्चा संघटनेच्या (Maratha Kranti Morchya) कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांची बदनामी केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दोन वर्षांपूर्वी ॲड. सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सदावर्ते यांना बुधवारी दुपारी चौकशीसाठी बोलावून घेतले होते. त्यानंतर आज पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊच्या सुमारास चौकशीसाठी बोलावले होते. सदावर्ते यांची सुमारे दोन तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर सदावर्ते प्रसारमाध्यमांशी न बोलता बाहेर पडले.

सदावर्ते हे त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमधून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातून बाहेर पडत असताना मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सचिन आडेकर, राजेंद्र कुंजीर यांच्यासह अन्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

दरम्यान, पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांचा इन कॅमेरा जबाब नोंदविला आहे. त्यांच्या आवाजाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. परंतु नेमकी चौकशी काय झाली याबाबत वरिष्ठ अधिकारी सांगू शकतील, असे पोलिस निरीक्षक विजय पुराणिक यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT