Attack on Uday Samant Vehicle in Pune
Attack on Uday Samant Vehicle in Pune Sarkarnama
पुणे

Attack on Uday Samant : परमेश्वर कृपेने मी वाचलो...पण पाळेमुळे शोधून काढू!

सरकारनामा ब्यूरो

पुणे : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे नेते आणि माजी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर पुण्यात हल्ला झाल्याने शिंदे गट विरुद्ध शिवसेना यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करत तुमच्याही गाड्या फुटतील, असा इशारा दिला आहे. दुसरीकडे या हल्ल्यामुळे मी घाबरणारा नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी सामंत यांच्याशी संपर्क साधला. तसेच पुणे पोलिस आयुक्तांनी सामंत यांच्याशी संवाद साधला. या हल्ल्यानंतर सामंत यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात जाऊन आपली तक्रार दिली. हल्ल्यानंतर योग्य ती खबरदारी घेतल्याबद्दल त्यांनी पोलिसांना सामंत यांनी धन्यवाद दिले. मात्र या हल्ल्याबद्दल कोणालाही त्यांनी संशय व्यक्त केला नाही. पण कोणी चिथावणी दिली असेल तर त्यांना शोधून काढण्याचा इशारा दिला.

या घटनेबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले माझ्यावर भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. मी कात्रज चौकत रेड सिग्नल असल्याने थांबलो होतो. माझी गाडी कुठे जाते, कशी जाते, याची पूर्ण माहिती घेऊन हा हल्ला करण्यात आला. माझ्या गाडीवर दगड टाकण्यात आले. लाथा मारल्या. याच्याशी संबंधित लोकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात कशा प्रकारची दहशत माजविण्याचे प्रकार आहे. मी या हल्ल्याला कोणाला जबाबदार धरणार नाही. शिवसैनिकांनाी हा हल्ला केलेला नाही. मी माझ्या नशिबाला दोष देतो आहे. मात्र या हल्ल्यामुळे उदय सामंत थांबणारा नाही. मात्र हल्ल्याच्या वेळी संबंधित काही बोलत होते, हे मी माझ्या तक्रारीत नमूद करेन.``

आज जर माझं बरंवाईट झालं असतं तर माझ्या आईला काय वाटलं असतं, माझ्या भावाला किती वाईट वाटलं असतं. परमेश्वराच्या आशीर्वादाने या मोठ्या हल्ल्यातून मी वाचलो. मी पोलिसांना यातील पाळेमुळे शोधून काढण्यास सांगितले आहे. असे हल्ले करून मी घाबरणारा नाही. अनेक संघर्षाला मी सामोरे गेलो आहे. मी शांत नेता आहे. माझा संयम ढळणार नाही, याची समोरच्यांनी जबाबदारी घ्यावी, असा इशाराही त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT