पुणे : पोलिसांची परवानगी न घेता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsinh Koshyari) यांच्या नावाने घोषणाबाजीकरून महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीच्या पायऱ्यांवर आंदोलन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांच्यासह ३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार देण्याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिकेतर्फे तक्रार देण्याची अपेक्षा असताना ती दिली गेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदीप देशमुख, महेश हांडे, दीपाली धुमाळ यांच्यासह २५ ते ३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई ज्ञानेश माने यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात (२८ फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप व पक्षातील इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापालिका इमारतीत जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना रोखले.तरीही इमारतीत घुसून जुन्या इमारतीच्या पायऱ्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नावाने घोषणाबाजी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
आंदोलन झालेले ठिकाण पुणे मनपाच्या अखत्यारित आहे. त्यामुळे मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रार द्यावी की पोलिस विभागाने तक्रार द्यावी, असा संभ्रम निर्माण झाला होता.पालिकेकडूनच तक्रार देणे अपेक्षित असतानाही त्यांनी तक्रार दिली नाही. त्यामुळे पोलिसांनी सर्व गोष्टींची शहानिशा केली. त्यानंतर पोलिस विभागातर्फे तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.