BJP sarkarnama
पुणे

भाजपचे मिशन बारामती; दिल्लीतून नियोजन

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) तीन दिवसीय बारामती दौऱ्यावर येणार आहेत

सरकारनामा ब्यूरो

इंदापूर : 2024 लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून कोणत्याही परिस्थितीत भाजपचाच (BJP) खासदार निवडून आण्यासाठी दिल्लीवरून नियोजन होत आहे. भाजपने ए फॉर अमेठी फत्ते केली. आता बी फॉर बारामती मिशन हाती घेतले आहे. असे प्रतिपादन बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघाचे भाजप प्रभारी आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी केले.

इंदापूर येथील अर्बन बँकेच्या सभागृहात बारामती लोकसभा मतदार संघ नियोजन तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) याचा 22, 23 व 24 सप्टेंबर रोजी तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 6 सप्टेंबर रोजी बारामती लोकसभा मतदार संघ दौऱ्या असणार आहेत. या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत राम शिंदे बोलत होते. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, किसन मोर्चा प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, पृथ्वीराज जाचक, अविनाश मोटे, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, मारुती वणवे, तेजस देवकाते यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

या वेळी बोलताना शिंदे म्हणाले, 2019 ला कोणालाही वाटेल नव्हते अमेठीमध्ये राहुल गांधी पराभूत होतील. मात्र, भाजपने ते करून दाखवले. आता 2024 ला बी फॉर बारामतीचे मिशन हाती घेतले आहे. यासाठीच देशाच्या अर्थमंत्री 22, 23, व 24 सप्टेंबरला बारामती लोकसभा मतदारसंघ दौऱ्यावर येणार आहेत, अशी माहिती दिली. बारामती लोकसभा मतदारसंघ दौऱ्यावर येणाऱ्या निर्मला सीतारामन याचे इंदापूर मध्ये भव्य दिव्य स्वागत केले जाईल, तसेच त्यांच्या माध्यमातून केंद्रीय पातळीवरील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. असे आश्वासन शिंदे यांनी देले.

या वेळी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व निर्मला सीतारामन यांच्या दौरा नियोजनाची माहिती दिली. यावेळी विलास वाघमोडे, शहरध्यक्ष शकील सय्यद, ॲड. कृष्णाजी यादव, अशोक इजगुडे, गोरख शिंदे, शेखर पाटील, सुनील अरगडे, हरिभाऊ जाधव, बाळासाहेब मोरे, माऊली चवरे, पिंटू काळे, माऊली वाघमोडे, गजानन वाकसे, यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी तालुकाध्यक्ष शरद जामदार यांनी प्रास्ताविक तर आभार तानाजी थोरात यांनी मानले.

निर्मला सीतारामन या तीन दिवस बारामती मतदारसंघ दौऱ्यावर येणार आहेत. यामध्ये 23 सप्टेंबर रोजी त्या इंदापूरमध्ये मुक्कामी येणार असून 24 सप्टेंबर रोजी सकाळी इंदापूर शहरांमध्ये प्रतिष्ठित नागरिक, डॉक्टर, वकील, व्यापारी शिक्षक, यांच्यासह त्या बैठक घेणार आहेत. त्यानंतर दुसरी बैठक निमगाव केतकी येथील संत सावतामाळी कार्यालय या ठिकाणी शेतकरी मेळावा तर तीसरी बैठक भिगवण येथे महिला मेळावा घेण्यात येणार आहे. अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT