Amit Shah Pune Tour  Sarkarnama
पुणे

Amit Shah Pune Tour : मोदींच्या पाठोपाठ शाहांच्या दौऱ्यामुळे पुणेकरांची तारांबळ; वाहतूक कोंडींने हैराण

सरकारनामा ब्यूरो

Pune News: पुणे शहरात वाहतूक कोंडी ही एक समस्याच बनलीय. जिथे जाल तिथे तुम्हाला वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. पुणे आणि वाहतूक कोंडी हे एक नातेच झाले आहे. सतत वाहतूक जाम होत असल्याने पुणेकर, वाहन चालक, कामगार, विद्यार्थी हैराण होत आहेत. यातच सध्या राजकीय नेत्यांचे आणि मंत्र्यांचे पुण्यात वाढणारे दौरे हे देखील सर्वसामान्यांसाठी त्रासदायक ठरत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर होते. शाह यांचे शहरात आगमन झाल्यानंतर वाहतुकीचा मोठा बोजवारा उडाला. शाहांच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आल्याने पुणेकरांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.

पिंपरी-चिंचवडमधील एका कार्यक्रमासाठी अमित शाह उपस्थित होते. यासाठी ते शनिवारी रात्रीच शहरात दाखल झाले होते. शाहांच्या या दौऱ्यादरम्यान ते ज्या मार्गाने प्रवास करणार आहेत, त्या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आल्याने पुणेकरांचा मोठा गोंधळ उडला.

पिंपरी-चिंचवड, औंध, बाणेर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, यासह पुण्यातील प्रमुख रस्त्यावर वाहनांच्या मोठं मोठ्या रांगा लागल्या होत्या. ही वाहतूक पुन्हा सुरळीत करताना वाहतूक पोलिसांची दमछाक झाली.

याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर होते. पंतप्रधानांचा दौरा असल्याने राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, इतर लोकप्रतिनिधीही पुण्यात असल्याने तेव्हाही शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. तर आज शाहांच्या दौऱ्याने पुन्हा त्यात भर पडली. आधिच वाहतूक कोंडींचा सामना करत असलेल्या पुणेकारांना मात्र, मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे आणखी मनस्ताप सहन करावा लागत आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिग्गज नेत्यांचे आणि मंत्र्यांचे दौरे पुण्यात वाढले आहेत. पण यापैकी कोणीही सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर बोलताना दिसत नाही. वाहतूक कोंडीला नेहमी सामोरे जाणाऱ्या पुणेकरांची यातून सुटका कधी होणार, हा एक मोठा प्रश्नच आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT