BJP-NCP
BJP-NCP Sarkarnama
पुणे

बारामतीनंतर शिरुरमध्येही राष्ट्रवादीला घेरण्याची भाजपची तयारी!

सरकारनामा ब्यूरो

Shirur : पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपने (BJP) मायक्रो प्लॅनिंग करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील निवडक १६ मतदार संघात थेट केंद्रातून नेते पाठवण्यात येत आहेत. यामध्ये खासकरुन राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) कडे असलेले मतदारसंघ लक्ष करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रेणुका सिंग या शिरुर मतदार संघाचा दौरा करणार आहेत.

रेणुका सिंग 14 सप्टेंबरला तीन दिवसांच्या शिरुर लोकसभा मतदार संघाच्या दौ-यावर येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुर लोकसभेच्या खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी रेणुका सिंग यांनी हा दौरा राजकिय दृष्टीकोनातुन न करता. शेतक-यांचा कांदा प्रश्न, आदिवासी हिरडा प्रश्न आणि किल्ले शिवनेरीवर भगवा ध्वज लावण्याबात असा, असा हल्लाबोल केला आहे. शिरुर दौरा राजकीय न करता मतदार संघातील प्रश्नसाठी करावा असेही कोल्हे म्हणाले होते.

त्यावर भाजपने प्रत्युत्तर देत रेणुका सिंग यांचा दौरा निवडणुकीसाठी नसुन मतदार संघातील प्रश्न समजुन घेण्यासाठी असल्याचे भाजपने म्हटले आहे. हा दौरा राजकीय दृष्टीकोनातुन नसुन वारकरी संप्रदाय, शेतकरी, क्रांतीकारक, माजी सैनिक आणि आदिवासी बांधवांचे मुळ प्रश्न समजावुन घेण्यासाठी असल्याचे भाजपचे नेते अतुल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. राजकीय नेत्यांनी निवडणुकांच्या आधीच स्वत: धडकी भरुन घेऊ नये असा, टोला खासदार कोल्हेंना लगावला.

रेणुका सिंग यांच्या शिरुर लोकसभा मतदार संघात तीन दिवसांचा दौरा असल्याने भाजपकडुन या दौ-यासाठीची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. बारामतीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन तर शिरुरसाठी माधुरी मिसाळ प्रभारी असणार आहेत. बारामती आणि शिरुर हे दोन्ही मतदार संघ ताब्यात घेण्यासाठी भाजपची छुपी रणनिती दिल्लीतुन सुरु असल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT