Santsh Deshmukh Murder Case : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणाला 25 दिवस पूर्ण झाल्यानंतर एक मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे देशमुख हत्याप्रकरणात फरार असलेल्या 3 आरोपींपैकी दोघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या आरोपींना बीड (Beed) पोलिसांनी 'वाँटेड' जाहीर केलं होतं. बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कावंत यांची याबाबत थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे. या गुन्ह्यात सीआयडी, एसआयटी आणि बीड पोलिसांचे पथक तपास करत आहे. CID आणि SIT पथक राज्यासह महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात तपासासाठी गेली होती.
यात 'वाँटेड' आरोपींना पकडण्यात यश आल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे या तिघांना 'वाँटेड' जाहीर केले होतं. यापैकी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळे यांना पुण्यातून ताब्यात घेतल्याची माहिती असून त्यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हा सहआरोपी आहेत. या दोघांनाही पोलिस (Police) कधी पकडणार असा सवाल राज्यभरातून विचारला जात होता. तर काहींनी या आरोपींची हत्या झाल्याचाही दावा केला होता. मात्र, अखेर आता या दोघांनाही आता पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे या हत्या प्रकणाच्या तपासाला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे.
एसआयटी आणि सीआयडीच्या टीमकडून देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सुरू असला तरी ही अटक बीडच्या स्थानिक पोलिसांनी केल्याचं सांगितलं जात आहे. तर या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती बीडचे जिल्हा पोलिस अधीक्षक देणार आहेत. यासाठी ते लवकरच पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.