Corona Vaccination Sarkarnama
पुणे

पुणे जिल्ह्यात लसीकरणाचे टार्गेट : दसऱ्यापर्यंत शंभर टक्के लसीकरण

एकाच दिवशी पाच लाख लसीकरणाचे विक्रमी उद्दिष्ट्य

umesh ghongade

सरकारनामा ब्यूरो

पुणे : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यासाठी आठ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत ‘मिशन कवच कुंडल अभियानास’ प्रारंभ करण्यात आला आहे. दसऱ्यापर्यंत जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. त्यासाठी तालुकास्तरावर टास्क फोर्सच्या बैठका आयोजित करून अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत.(Vaccination target in Pune district: 100% vaccination till Dussehra)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आरोग्य विभागाने लसीकरण करण्याची जबाबदारी पार पाडावी. या मोहिमेसाठी इतर सर्व विभागांचा सहभाग घेण्यात यावा. कोणत्याही परिस्क्षितीत मनुष्यबळाअभावी लसीकरण मोहीम पार पाडण्यास अडचण येणार नाही, याची जबाबदारी तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांवर राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत सलग ७५ तास लसीकरण मोहीम राबविण्यात आली. पुणे शहरातील कमला नेहरु रुग्णालय आणि सुतार रुग्णालय याठिकाणी सलग ७५ तास लसीकरण मोहीम ५ ऑक्टोबरपासून सुरू आहे. तर, पुणे ग्रामीण कार्यक्षेत्रात स्त्री रुग्णालय बारामती, उपजिल्हा रुग्णालय दौंड, ग्रामीण रुग्णालय चाकण, प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोली, खडकवासला, लोणीकाळभोर व उपकेंद्र हिंजवडी या सात ठिकाणी सलग ७५ तास लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.

असे आहे टार्गेट

- सलग ७५ तास लसीकरण

- एकाच दिवशी पाच लाख लसीकरणाचे विक्रमी उद्दिष्ट्य

- कोविड लसीकरण आपल्या दारी उपक्रम

- ध्येय महिलांच्या शंभर टक्के लसीकरणाचे

- शंभर टक्के लसीकरण, दुसऱ्या डोससाठी प्राधान्य

- खासगी संस्क्षाचा सक्रिय सहभाग

सहा ऑक्टोबर अखेरची स्थिती :

एक कोटी ९ लाख २३ हजार १३ नागरिकांचे लसीकरण पूर्ण

पुणे महापालिका : ४७ लाख ३ हजार १५४

पिंपरी-चिंचवड महापालिका : २० लाख ५७ हजार २०

पुणे ग्रामीण : ४१ लाख ६२ हजार ८३९ लसीकरण पूर्ण

पहिला डोस : ७३ लाख १७ हजार ४३८ नागरिकांना (८८ टक्के)

दुसरा डोस : ३६ लाख ५ हजार ५७५ नागरिकांना (४९ टक्के)

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT