Sunil Tingre Vs Jagdish Mulik Sarkarnama
पुणे

Sunil Tingre Vs Jagdish Mulik: महायुतीत वादाची ठिणगी; युती धर्म फक्त आम्हीच पाळायचा का? मुळीकांचा टिंगरेंना सवाल

Vadgaon Sheri Assembly Constituency Jagdish Mulik ON Sunil Tingre: महायुतीचा धर्म काय भाजप आणि शिवसेनेनीच पाळायचा का? महायुतीचा धर्म पाळणं, ही महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षाची जबाबदारी आहे, पण वडगावशेरीच्या या आमदारांना महायुतीचा विसर पडला आहे !

Sudesh Mitkar

Pune News : पु्ण्यात वडगाव शेरी विधानसभेची (Vadgaon Sheri Assembly Constituency) जागा महायुतीत कुणाला सुटणार याचा खल सुरु असतानाच आजी-माजी आमदारांमध्ये शाब्दीक युद्ध सुरु झाले आहे. महायुतीत वडगाव शेरीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच महायुतीत घटक पक्षामध्ये कलगीतुरा रंगला आहे.

पुण्यातील वडगाव शेरी मतदार संघामध्ये 300 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. या भूमिपूजनानिमित्त आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांनी प्रसिद्ध केलेल्या पोस्टरवर फक्त अजित पवार यांचा फोटो वापरला आहे. त्यामुळे भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik) संतापले आहेत. युती धर्म फक्त आम्हीच पाळायचा का असा सवाल त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना केला आहे.

वडगाव शेरी मतदारसंघातील येरवडा मध्यवर्ती इमारत, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय इमारत आणि जमावबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख इमारत या अशा तब्बल ३०६ कोटी ४१ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. अजित पवार हे महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत अहिल्याभवन इमारतीच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी देखील करणार आहेत.

हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्या माध्यमातून आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे पोस्टर परिसरात झळकले आहेत. कुठेही महायुती सरकारचा अथवा महायुतीतील इतर नेत्यांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील फोटो वापरण्यात आलेला नाही. यावरून वडगाव शेरीचे भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी संताप व्यक्त केला आहे.

जगदीश मुळीक म्हणाले,वडगाव शेरी विधानसभेत महायुतीचा धर्म काय भाजप आणि शिवसेनेनीच पाळायचा का? महायुतीचा धर्म पाळणं, ही महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षाची जबाबदारी आहे, पण वडगावशेरीच्या या आमदारांना महायुतीचा विसर पडला आहे ! अशी टीका जगदीश मुळीक यांनी केली.

'वडगावशेरीमध्ये तीनशे कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन होत आहे, हे नागरिकांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. पण या विकासकामांचा पाठपुरावा आमच्यासारख्या महायुतीतील मंडळींनी केला आहे, हे आमदार जाणीपूर्वक विसरत आहेत,'असे खडेबोल मुळीकांनी टि्वट करीत टिंगरे यांनी सुनावले.

तीनशे कोटींच्या विकासकामांचा निधी मिळतो, तेव्हा त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस यांचेही योगदान आहे, पण त्यांचा साधा फोटो टाकण्याचे सौजन्यही आमदार महोदय श्रेय लाटण्याच्या स्वार्थी भावनेत दाखवले नाही, असे जगदीश मुळीक यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT