Rajendra Hagawane  Sarkarnama
पुणे

Vaishnavi Hagawane case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड; मुख्य आरोपी कोण? 6 जणांवर आरोप निश्चित; आता कोर्ट...

Maharashtra court decision News : वैष्णवी हगवणे हिने विवाहानंतर सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.

Sudesh Mitkar

Pune News : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने राज्यभरात हुंडा प्रथा आणि विवाहित महिलांवरील घरगुती हिंसाचारावर मोठी चर्चा निर्माण केली होती. वैष्णवी हगवणे हिने विवाहानंतर सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.

या प्रकरणांमध्ये राजकीय दबाव आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचं कथाकथित इन्व्हॉलमेंटमुळे हे प्रकरण आणखीनच चर्चेत राहिले होते. त्यानंतर आता न्यायालयीन प्रक्रिया वेगाने पुढे सरकत असून, कोर्टाने या प्रकरणात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात सत्र न्यायालयाने सहा आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले आहेत. हे प्रकरण राज्यात मोठी खळबळ उडवणारे ठरले होते, ज्यात वैष्णवीचा मृतदेह 16 मे 2025 रोजी भुकूम येथील घरात सासरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता.

शवविच्छेदन अहवालात वैष्णवीच्या शरीरावर जखमांच्या अनेक खुणा आढळल्या होत्या, ज्यामुळे आत्महत्या की खून असा संशय निर्माण झाला होता. वैष्णवीच्या वडिलांनी 17 मे 2025 रोजी दिलेल्या तक्रारीनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला.या प्रकरणात वैष्णवीचे पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, माजी राष्ट्रवादी नेते सासरे राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे आणि कुटुंबीय मित्र निलेश चव्हाण यांना अटक करण्यात आली होती.

या आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलमांतर्गत हुंडाबळी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, छळ, मारहाण, कट रचणे आणि पुरावे लपवण्याचे गंभीर आरोप आहेत. तर निलेश चव्हाण याच्यावर वैष्णवीच्या अल्पवयीन मुलाला बेकायदेशीर ताब्यात ठेवणे आणि धमकावण्याचा अतिरिक्त आरोप ठेवण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जुलै 2025 मध्ये 11 जणांविरुद्ध 1670 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. आता सत्र न्यायालयाने या सहा मुख्य आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले असून, खटल्याची सुनावणी 23 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT