Sarjerao Waghmare Sarkarnama
पुणे

Vanchit News : मंगलदास बांदलांनंतर वंचितने विजयी स्तंभ सेवासंघाच्या अध्यक्षांनाच उतरवले शिरूरच्या रिंगणात

सरकारनामा ब्यूरो

सागर आव्हाड

Lok Sabha Election 2024 : शिरूर लोकसभा मतदारसंघातून वंचितने मंगलदास बांदल Mangaldas Bandal यांची उमेदवारी रद्द केली. त्यांच्या जागी आता वंचित बहुजन आघाडी शिरूरचा नवा उमेदवार जाहीर करणार आहे. भीमा कोरेगाव शौर्य स्तंभाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे हे आता वंचितकडून शिरूरचे उमेदवार असणार, अशी माहिती साम वृत्तवाहिनीला मिळाली आहे. बांदल यांची उमेदवारी रद्द केल्यानंतर वंचितने घेतलेल्या शोधात सर्जेराव वाघमारे यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्या नावाची फक्त घोषणा करण्याची औपचारिकता बाकी असल्याचेही सूत्रांनी सांगितले. Vanchit candidature Sarjerao Waghmare from Shirur Lok Sabha Constituency after Cancel Mangldas Bandal.

महाविकास आघाडीबरोबरची बोलणी फिसकटल्यानंतर वंचितने महाराष्ट्राती़ल लोकसभेचे उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली. त्यात शिरूरमध्ये वंचितने Vanchit पैलवान मंगलदास बांदल यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या रूपाने वंचितला तगडा उमेदवार मिळाल्याचे बोलले जात होते. मात्र, वंचितची उमेदवारी मिळूनही बांदल यांनी पुण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांची भेट घेतली होती. याची दखल घेत वंचितने शिरूरमधील बांदल यांची उमेदवारी रद्द केली.

बांदल यांच्यासारखा उमेदवार रद्द केल्यानंतर वंचितकडून त्यांच्या तोडीसतोड अशा उमेदवाराचा शोध घेण्यात आला. यात शिरूर लोकसभा मतदारसंघातील काही नावांची यादी तयार केली आहे. यात भीमा कोरेगाव शौर्य स्तंभाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे Sarjerao Waghmare यांचे नाव आघाडीवर आहे. सर्जेराव वाघमारे शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचे चोख नियोजन करत असतात. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांचा जनसंपर्कही मोठा आहे.

उमेदवारी मिळताच बांदलांनी केला होता हा दावा...

"भाजप वगळता इतर सर्वच राजकीय पक्षांनी सध्या संविधान वाचविण्याची मोहीम उघडली आहे. त्यामुळे ते लिहिलेल्यांच्या (भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर) नातवाने उमेदवारी देणे यापेक्षा आणखी काय हवे," अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. तसेच खासदार अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव Shivajirao Adhalrao Patil यांच्यावर सडकून टीका केली होती. कोल्हे Amol Kolhe हे पाच वर्षांत मतदारसंघात फिरकले नाहीत, तर आढळराव हे आयात उमेदवार आहेत. त्या दोघांनाही या पैलवानाचा फटका सहन होणार नाही. सहाही विधानसभा मतदारसंघांत आपली ताकद असल्याचा दावाही त्यांनी करत शिरूरमधून जिंकण्याचा विश्वासही व्यक्त केला होता.

(Edited by Sunil Dhumal)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT