Vanraj Andekar Murder Sarkarnama
पुणे

Vanraj Andekar Murder : सख्ख्या बहिणींसह दाजींनीच काढला काटा; आंदेकर कुटुंबातच गँगवॉर

Sudesh Mitkar

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची रविवारी रात्री हल्लेखोरांनी कोयत्याने वार करून आणि गोळ्या घालून हत्या केली. यानंतर पोलिसांनी संशयित आरोपींना अटक केली असून या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. हत्येमध्ये वनराज आंदेकर यांच्या दोन सख्ख्या बहिणींचाच हात असल्याचे समोर आले आहे.

वनराज यांचे वडील सूर्यकांत ऊर्फ बंडू राणूजी आंदेकर यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांच्याच दोन मुलींनी आणि दोन जावयांच्या सांगण्यावरून वनराज यांची हत्या करण्यात आली आहे. आत्तापर्यंत 10 आरोपी निष्पन्न झाले असून 4 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.

वनराज आंदेकर यांच्या खूनाचा कट दीड ते दोन महिन्यांपासून शिजत होता. अटक करण्यात आलेल्या तीन जणांमधील सोम्या गायकवाड हा वनराज आंदेकर यांच्या खूनाचा मास्टरमाईंड आहे. तर, सोम्या गायकवाड हा पूर्वी आंदेकर टोळीत सक्रिय होता.

एका भांडणामध्ये मध्यस्थी करून भांडणे मिटवल्याच्या तसेच नगरसेवक असताना दुकानाचे अतिक्रमण पाडायला लावल्याचा संशय आरोपींना होता. या रागातूनच कट रचून वनराज यांची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांन आहे.

दरम्यान, वनराज आंदेकर यांचे नाना पेटीतील डोके तालीम येथे घर आहे. रविवारी रात्री साठेआठच्या दरम्यान वनराज घराच्या परिसरात उभे असताना एक टोळके दुचाकीवरून तिथे आले. त्यांनी थेट वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर धारदार शस्त्रानं त्यांच्यावर हल्ला केला.

हल्ल्यानंतर वनराज यांना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. गोळीबाराच्या घटनेपूर्वी डोके तालीम परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT