Vasant More News, Pune News, Pune Latest Marathi News
Vasant More News, Pune News, Pune Latest Marathi News Twitter/@vasantmore
पुणे

'सगळी प्रॉपर्टी विकली तरी...'; वडीलांच्या आठवणीत वसंत मोरे भावूक

सरकारनामा ब्युरो

Vasant More latest news

पुणे : मनसेचे पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. सोशल मीडियावर त्यांनी केलेल्या पोस्टही चर्चेत असतात. असे असताना आताही वसंत मोरे यांनी ट्विट केलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वसंत मोरे यांनी आपल्या वडिलांच्या सायकलचा एक फोटो ट्विट करत आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

''या सायकलच्या मागील कॅरिअरवर अनेक दिवस रात्री, अनेक वर्षे बसून फिरलोय. ही सायकल कमीत कमी ३० वर्षांपूर्वीची आहे. कुऱ्हाडही अजून तीच आहे. सगळी प्रॉपर्टी विकली तरी हिची सर येणार नाही. कारण जेव्हा गमावण्यासारखे जवळ काहीच नव्हते तेव्हा फक्त हीच होती.भले आज माझ्याकडे Audi ,BMW, इनोव्हा , harley Davidson आहे पण त्यामध्ये बसण्यासाठी मला त्या सायकलवर घेऊन फिरणारा वाघासारखा माझा बाप आज नाही. म्हणून ही सायकल मी अजून जपून ठेवली आहे,'' असे वसंत मोरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. (Pune Latest Marathi News)

संजय नहार यांचे वसंत मोरेंना पत्र

काही दिवसांपूर्वी सरहद संस्थेच्या संजय नहार यांनी वसंत मोरे यांना पत्र पाठवले होते, या पत्राचीही सोशल मीडियावर चर्चा रंगली होती.राजाने कर्तृत्ववान सरदाराचा सन्मान राखला पाहिजे, असेही संजय नहार यांनी आपल्या पत्रात म्हंटले.

पत्रात वसंत मोरे यांनी मशिदींवरील भोग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेचं संजय नहार यांनी कौतुक करत मनसेला काही सल्लेही दिले होते. ''सध्या एकूणच घडणाऱ्या घटनांमुळे अस्वस्थ होऊन मी हे पत्र लिहीत आहे. तुमच्या राजकीय भूमिका काय असाव्यात हा तुमचा व्यक्तिगत आणि कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे. मीदेखील तुमच्याप्रमाणे ठाकरे कुटुंबीयांवर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. मात्र, सामान्य माणसासाठी आणि प्रभागात शांतता राहावी यासाठी तुम्ही घेतलेली भूमिका आणि त्याची मोजलेली किंमत यामुळे सर्वत्र अंधार नाही,'' अशी माझी खात्री झाली आहे, असेही नहार यांनी म्हटले होते.

''आधीच लोक एकीकडे उन्हाने तर दुसरीकडे असंख्य अडचणींनी गांजले आहेत त्यांना अस्थिर करू नये, यासाठीची तुमची तळमळ खूप महत्त्वाची वाटते. सरदार मोठा झाला तर राजा आपोआप मोठा होतो मात्र राजा मोठा आहे म्हणून सरदार मोठे होतातच असे नाही असे मला मनापासून वाटते. तुमच्यासारखे कर्तृत्ववान सरदार हीच पक्षाची, समाजाची आणि देशाची शक्ती असते. तुमच्यासारखे सरदार दुखावले जावू नये त्यांचा योग्य तो सन्मान, 'राजा' ने समाजाने आणि देशाने राखला पाहिजे. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि तुमचे कर्तृत्व सदैव उजळत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.'' अशा भावना संजय नहार यांनी पत्रात व्यक्त केल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT