Nilesh Mazire , Eknath Shinde  Sarkarnama
पुणे

मनसेला 'जय महाराष्ट्र' ठोकल्यानंतर वसंत मोरेंचा कट्टर समर्थक शिंदे गटात!

Nilesh Mazire in Shinde Group : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली मोठी जबाबदारी...

सरकारनामा ब्यूरो

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी पदाधिकारी व वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक निलेश माझिरे यांची काही दिवसांपूर्वी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. यानंतर माझिरे कोणत्या पक्षात जाणार याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र, माझिरे यांनी शिंदे गटात प्रवेश केला असून त्यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठी जबाबदारी देखील सोपविली आहे.

निलेश माझिरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील वर्षा बंगल्यावर बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केला आहे. माझिरे यांच्याकडे माथाडी कामगार सेनेच्या पुणे जिल्ह्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे. कारण त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते देखील शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

माझिरे यांची दुसर्यांदा हकालपट्टी...

निलेश माझिरे (Nilesh Mazire) यांची मनसे नेते व नगरसेवक वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख आहे. त्यांची मैत्री देखील सर्वश्रुत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे आणि शहर मनसेमध्ये सातत्याने खटके उडालेले पाहायाला मिळत आहे. यात राज ठाकरेंनी मध्यस्थी करुन देखील हा वाद अद्यापही सुरुच आहे. यातच माझिरे यांची मनसेच्या माथाडी कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षपदावरुन तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली होती. पण त्यानंतर माझिरेंना सोबत घेत मुंबई गाठत मध्यस्थी केली होती.

मात्र, राज ठाकरेंच्या या आदेशाने दुसर्यांदा निलेश माझिरे यांची मनसेतून हकालपट्टी करण्यात आली. यावेळी त्यांनी 400 जणांसह मनसेला रामराम ठोकला आहे. पक्ष सोडताना बाबू वागस्कर यांच्यावर गंभीर आरोप देखील केले होते.

वसंत मोरेंशी उडाले खटके...

पुणे मनसेचे शहराध्यक्ष असताना वसंत मोरे (Vasant More )यांनी निलेश माझिरे यांनी पक्षात प्रवेश देत त्यांच्या हाती जिल्हाध्यक्षपदाची धुरा दिली होती. तसेच त्यांच्यातील मैत्रीही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत होता. पण काही दिवसांपूर्वी वसंत मोरेंनी माझिरेंनी पक्ष सोडला माझा त्याचा संबंध संपला असं विधान केलं होतं. त्यानंतर मोरेंना माझी गरज नाही तर मला पण त्यांची गरज नाही असं वक्तव्य केलं होतं. आत मोरे मनसेत असून माझिरे यांनी त्यांचा नवीन राजकीय प्रवास सुरु केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT