Vasnat More - Ajay Shinde - Kishore Shine - Suhas Nimhan 
पुणे

पुण्यातून वसंत मोरे, किशोर शिंदे, अजय शिंदे, सुहास निम्हण मनसेचे उमेदवार

महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभेच्या रिंगणात उतरत असून आज पक्षाने २७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पुण्यात वसंत मोरे, किशोर शिंदे, अजय शिंदे, सुहासनिम्हण यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडेही माहिम मतदारसंघातून ही निवडणूक लढवणार आहेत.

वैदेही काणेकर

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभेच्या रिंगणात उतरत असून आज पक्षाने २७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पुण्यात वसंत मोरे, किशोर शिंदे, अजय शिंदे, सुहास निम्हण यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडेही माहिम मतदारसंघातून ही निवडणूक लढवणार आहेत. 

मनसे लोकसभेची निवडणूक लढली नव्हती. त्या निवडणुकीत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात प्रचार केला होता. यावेळी मनसे विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहे. मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे कलिना मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. नितीन सरदेसाई यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. पण पहिल्या यादीत त्यांचे नांव नाही.

पुण्यातील उमेदवार पुढील प्रमाणे;
वसंत मोरे - हडपसर
अॅड. किशोर शिंदे - कोथरुड
अजय शिंदे - कसबा
सुहास निम्हण - शिवाजीनगर 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT