Prakash Ambedkar Sarkarnama
पुणे

Prakash Ambedkar : मोठी बातमी! प्रकाश आंबेडकरांवर 'आयसीयू'त उपचार सुरू

Prakash Ambedkar Health Update : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आंबेडकर यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांच्यावर 'आयसीयू'मध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

Jagdish Patil

Pune News, 31 Oct : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आंबेडकर यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांच्यावर 'आयसीयू'मध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

गुरुवारी पहाटे छातीत दुखू लागल्याने आंबेडकर यांना पुण्यातील (Pune) रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या हृदयात रक्ताची गाठ झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून काही वेळातच त्यांच्यावर अँजिओग्राफी केली जाणार आहे. तर प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) प्रकृतीबाबत कुणीही प्रश्न विचारून व्यत्यय आणू नये. कुटुंबाच्या गोपनीयतेच्या विनंतीचा आदर करावा, अशी विनंती आंबेडकर कुटुंबियांकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, अँजिओग्राफी केल्यानंतर पुढील 3 ते 5 दिवस प्रकाश आंबेडकर डॉक्टरांच्या निरीक्षणात राहणार असून पुढील काही दिवस वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचे नेतृत्व प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती आणि माध्यम आणि संशोधन विभागाच्या सहकार्याने केलं जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT