Ncp Laeader Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Sharad Pawar : राज्य समजून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची वाढलेली गती चांगली ; पवारांचा टोला

Sharad Pawar : एकनाथ शिंदे यांच्या गणपती दर्शनावरुनही शरद पवार यांनी टोला लगावला आहे.

सरकारनामा ब्युरो

पुणे : "महाराष्ट्रातून वेदांता-फॉक्सकॉन (vedant project) प्रकल्प राज्यात पुन्हा येणार नाही. पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मोठा प्रकल्प आणू म्हणणे म्हणजे लहान मुलाला फुगा त्याच्यापेक्षा मोठा म्हणण्यासारखे आहे," अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी टोलेबाजी केली. ते पुण्यात बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणपती दर्शनावरुनही शरद पवार यांनी टोला लगावला आहे.

शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला दोन महिने झाले, त्यांच्या कामाविषयी काय वाटते, राज्यातील सत्तारानंतर कामांना गती मिळाली आहे का? असा प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले. "मला बाकी कशात गती मिळाली आहे, असे वाटत नाही. पण, एक मात्र नक्कीआहे. राज्याचे नेतृत्व मोठ्या गतीने फिरत आहे. राज्य समजून घेण्यासाठी त्यानी वाढवलेली गती चांगली आहे," "शिंदे सरकार राज्य समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत," असा टोला पवारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

"वेदांता-फॉक्सकाँन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला. तर आता चर्चा कशाला. केंद्रातील सत्ता हातात असल्यास राज्यात येणारे प्रकल्प बाहेर जातात, असे प्रकार घडत असतात. शिंदे-भाजप सरकारला राज्यात प्रकल्पाची गरज वाटत नाही, वेदांता प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणे हे दुदैव आहे, गुजरातला गेलेला हा प्रकल्प पुन्हा येणे अशक्य आहे" असा टोलाही त्यांनी हाणला.

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प (vedant project)गुजरातला गेल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारच्या (maharashtra) विरोधात आज राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसची (ncp)निदर्शने सुरु आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे.

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रबाहेर नेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापेक्षा मोठा प्रकल्प देण्याचे दिले आश्वासन दिले आहे. "पण हा केवळ आश्वासनांचा लॉलीपॉप राज्याला दिला आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचं पुण्यातील बालगंधर्व चौकात लॉलीपॉप आंदोलन सुरु आहे.

शरद पवार म्हणाले..

  • वाद उकरुन काढण्यात सत्ताधारी आणि विरोधक व्यग्र आहेत.

  • राज्य अस्थिर करण्याचा मोदी-शहांचा अजेंडा

  • देशातील बिगर भाजप अस्थिर करण्याचा डाव

  • विरोधक-सत्ताधारी यांनी दावे-प्रतिदावे बंद करावेत

  • शिंदे सरकार राज्य समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

  • वेदांता प्रकल्प गुजरातला नेला, तो मोदींनी पुन्हा महाराष्ट्रात आणावा

  • वेदांताकडून यापूर्वी प्रकल्प महाराष्ट्रातून हलविण्यात आले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT