Vijay Shivtare  Sarkarnama
पुणे

Vijay Shivtare News : निष्ठा फसली बंड शमलं, तरीही शिवतारे करताहेत काॅलर टाइट

Sudesh Mitkar

Vijay Shivtare loksabha Election 2024 : शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी फडकवलेले बंडाचे निशान आता खाली घेतले आहे. लोकांच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण ‘तह’ केला असून, पुरंदरच्या इतिहासातला हा दुसरा ‘तह’ असल्याचे स्पष्टीकरण शिवतारे यांनी दिले आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या पुरंदरच्या तहाच्या गोष्टींचा आधार घेतला.

विजय शिवतारे यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पवार कुटुंबीयांना लक्ष्य करत लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचे निश्चित केले होते. यानंतर ‘सागर’ बंगल्यावर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत विजय शिवतारे यांची समजूत काढण्यात आली. या बैठकीनंतर विजय शिवतारे यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. आपण महायुतीसोबतच राहून राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या काळात शिवतारेंच्या शिंदेंप्रतींच्या निष्ठा शमल्या आणि मविआतून अजित पवारांविरोधात पुकारलेले बंड फसले आहे, हे खरे. maharashtra latest news politics

बैठकीनंतर विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. शिवतारे म्हणाले, लोकांची भावना त्यामुळे मी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला, तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मी दोनदा चर्चा केली. एकनाथ शिंदे हे माझ्यावरती रागावलेदेखील. परंतु मी तिथून निघून आलो. त्यानंतर 26 तारखेला ⁠खतगावकर मुख्यमंत्र्यांचा ओएसडी यांचा फोन आला. त्यामुळे मी निर्णयाचा परत विचार केला. माझ्यामुळे दहा वीस खासदार पडतील. मुख्यमंत्री अडचणीत येतील, असे त्यांनी सांगितले.Latest Political News on Vijay Shivtare

त्यामुळे मुख्यमंत्र्यांची अडचण समजून घेऊन मी चर्चा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या समवेत रात्री २ तास चर्चा झाली. त्यामध्ये माझं म्हणणं ऐकून घेण्यात आलं. या वेळी मी माझ्या काही मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. यामध्ये गुंजवनी धरणाचे पाणी पुरंदरला आणायचे. पुरंदर विमानतळ आणि पुरंदर येथे नवीन बाजार समिती / राष्ट्रीय बाजार सुरू करायचा. या तीन मागण्यांवर आचारसंहिता झाली की काम सुरू होणार, या अटींवर मी तह करण्याचा निर्णय घेतला. ज्या प्रकारे इतिहासात पुरंदरचा तह झाला होता, तशाच प्रकारचा तह केला असल्याचं शिवतारे यांनी सांगितलं.

तसेच फुरसुंगी - आळंदी देवाची येथे स्वतंत्र नगरपालिका करा हा भाग पुणे महापालिकेत घेऊ नका, अशीदेखील मागणी मी केली. या सर्व घोषणा मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री प्रचारादरम्यान सासवड येथे सभेत करणार आहेत.

त्यामुळे आजच्या बैठकीत मी कार्यकर्त्यांना पुरंदरमधून महायुतीच्या उमेदवाराला दीड लाख मताधिक्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत. अजितदादांच्या अगदी मागील काही काळांमध्ये चुका झाल्या असतील. मात्र, नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे हात बळकट करण्यासाठी पूर्ण ताकतीने आणि ठासून प्रचार करणार असल्याचा ठराव आम्ही केला असल्यांचं शिवतारे यांनी सांगितलं.

⁠राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू नसतो. अजितदादांचे आभार मानतो. तेही बैठकीला बसले. आता पवारविरोधी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे वळतील.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात केलेला तह इतिहासात प्रसिद्ध आहे. तसाच हा दुसरा पुरंदरचा तह लोकांच्या हितासाठी केला असल्याचं स्पष्टीकरण शिवतारे यांनी दिलं.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT