Vishal Tambe Sharad Pawa sarkarnama
पुणे

Vishal Tambe News : 'मी कायम साहेबांसोबतच...', विशाल तांबेंचा सर्व चर्चांना पूर्णविराम; 'तो' सस्पेन्सही संपवला!

Vishal Tambe Sharad Pawar : माजी नगरसेवक विशाल तांबे यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम लावत ते शरद पवारांसोबत कायम असल्याचे स्पष्ट केले आहे.

Roshan More

PMC Election : माजी नगरसेवक विशाल तांबे हे यंदा निवडणुकीच्या मैदानात उतरणार नाहीत. त्यांनी निवडणूक न लढण्याच्या घोषणेने विविध चर्चांना उधाण आले होते. मात्र, सर्व चर्चांना पूर्णविराम लावत आपण कायम साहेबांसोबत असल्याचे स्पष्ट केले.निवडणुकीच्या मैदानात न उतरण्याबाबत त्यांनी स्पष्ट केले की, आता थांबतोय तो स्वल्पविराम आहे. पूर्णविराम नाही.

ते म्हणाले की, मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. समाजकारण व राजकारणात यापुढे कायम असणार आहे.फक्त पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीमध्ये उमेदवार असणार नाही एवढंच.

काल,आज, उद्याही साहेबांसोबत...

निरर्थक चर्चा वाऱ्यासारख्या असतात. त्या पाऱ्यासारख्याच उडून जातात. आमची निष्ठा साहेबांसोबत कालही होती आजही आहे आणि उद्याही राहील आजवर रणधुमाळीत चाललेली पावलं आता थांबायला हवीत, सत्तेच्या सावलीत हरवलेली शांतता आता गवसायला हवी, असे देखील त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टरमध्ये म्हटले आहे.

'तो' सस्पेन्सही संपवला

विशाल तांबे यांनी आपण निवडणुकीच्या मैदानात नसणार असे स्पष्ट केले होते. त्यामुळे ते राजकारणातून निवृत्तच होत असल्याची चर्चा होती. मात्र, निवृत्तीचा सस्पेन्स देखील त्यांनी थांबवत आपण पक्षाच्या संघटनेच्या कामात सक्रीय असणार असल्याचे स्पष्ट केले.

भाजपसाठी निवडणूक अवघड...

विशाल तांबे यांनी ते निवडणुकीच्या मैदानात नसले तरी पक्षासाठी सक्रीय राहणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे धनकवडी भागात भाजपसाठी एकतर्फी वाटणारी निवडणूक अवघड झाल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीसोबत ही निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक वाॅर्डत पक्षाकडून मजबुत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT