Vivekanand Patil News : पुण्यात सुरू असलेले एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन रविवारी मध्यरात्री स्थगिती करण्यात आले. सरकारने चौकशी समितीची घोषणा केल्यानंतर तसेच आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केले. दरम्यान, या आंदोलनाचा चेहरा बनलेला विवेकानंद पाटील याने आनंद व्यक्त करताना भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांना डिवचले.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना विवेकानंद म्हणाला, 'नवनाथ बनला सांगेन आम्ही गाढव नाही वाघ आहोत. शिकार केलीये.कुणाच्या पण नादाला लागायचं आमच्या नादाला लागायचं नाय'
ते म्हणाले, हा विद्यार्थी एकजुटीचा विजय आहे. आमची एकजूट जिंकली आहे. ज्यांना ही गाढवं आर्बन नक्षल वाटत होती. त्यांना आम्ही सांगतोय भारतीय संविधान वाचलेली पोरं आज जिंकलेली आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार मानतो. त्यांनी संवेदनशीलता दाखवून त्यांनी विद्यार्थी हितासाठी निर्णय घेतला. सरकारने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. सरकारला आम्ही 60 दिवसांची मुदत दिली आहे. तोपर्यंत विवेक भीमनवार पदावरून दूर झाले आहेत.
विद्यार्थी हे भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते. त्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली होती. अखेर मध्यरात्री भीमनवार यांनी ट्विट करत ते रजेवर जात असल्याचे जाहीर केले. ते म्हणाले, एमपीएससी पेपरफूट प्रकरणात राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात नैतिकतेला कायम प्राधान्य दिले. त्यामुळे ही चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावर कार्यरत न राहता या कालावधीत रजेवर जाण्याचा निर्णय मी घेतला आहे.एमपीएससीची स्वायत्तता, विश्वसनीयता आणि विद्यार्थीहिताला कायम माझे प्राधान्य होते आणि यापुढेही असेल.
जयहिंद ! जय महाराष्ट्र
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.