Amol Kolhe | Chhagan Bhujbal  Sarkarnama
पुणे

Amol Kolhe: अजितदादांची भुजबळांना राज्यसभेवर पाठवण्याची सुरु होती तयारी? अमोल कोल्हेंचा गौप्यस्फोट; कारणही सांगितलं

Amol Kolhe: अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या विलिनिकरणासंदर्भात झालेल्या बैठकीवेळी खुद्द अजितदादांनीच हे सांगितल्याचं कोल्हेंनी स्पष्ट केलं आहे.

Amit Ujagare

Amol Kolhe: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरु होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल केल्हे यांनी केला आहे. पुणे विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त आयोजित एका व्याख्यानासाठी आले असताना त्यांनी माध्यमांशी बोलताना हा गौप्यस्फोट केला. तसंच यामागचं कारणंही त्यांनी सांगितलं आहे.

अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?

अमोल कोल्हेंना पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनिकरणावर प्रश्न विचारला. कारण अजित पवारांसोबत जी बैठक झाल्याचं सांगितलं जात त्या बैठकीत स्वतः कोल्हे देखील हजर होते. त्यामुळं या बैठकीचा तपशील सांगताना कोल्हेंनी छगन भुजबळांना अजितदादा राज्यसभेवर पाठवण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं. आत्तापर्यंत ही माहिती बाहेर आली नव्हती त्यामुळं कोल्हेंनी केलेला हा गौप्यस्फोटच ठरला आहे.

अमोल कोल्हे म्हणाले, "जातनिहाय जनगणना होत असताना ओबीसीचा कॉलमच या जातनिहाय जनगणनेच्या फॉर्ममध्ये नाही अशी परिस्थिती असताना भुजबळांसारखा एक वरिष्ठ नेता हा संसदेत असणं ही फार महत्वाची गोष्ट होती. आमच्यासोबत जी काही प्राथमिक चर्चा अजितदादांसोबत झाली होती तेव्हा चर्चांच्या ओघात त्यांनी सांगितलं होतं की, भुजबळ हे राज्यसभेवर असतील, अशी चर्चा आमची अंतर्गत झाली होती"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT