Nashik - Pune ACB News Sarkarnama
पुणे

ACB action in Pune : दहा हजारांची लाच घेणाऱ्या वजनमापे निरीक्षकाच्या घरात सापडलं घबाड!

Bribery Case : प्रवरानगर येथे लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर एसबीने पुण्यातील घरी मारला छापा

उत्तम कुटे: सरकारनामा

Pune ACB Action News : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील वजनमापे निरीक्षक अशोक श्रीपती गायकवाड (वय -52) यास दहा हजार रुपयांची लाच घेताना नगर 'एसीबी'ने सोमवारी पकडले. यानंतर मंगळवारी त्याच्या पुणे येथील घराच्या झडतीत पुणे एसीबी युनीटला मोठे घबाड मिळाले. साडेअठ्ठावीस लाख रुपयांची बेहिशोबी रोकड एसीबीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील सहकारी ट्रक वाहतूक संस्थेचा प्रवरानगर येथे पेट्रोलपंप आहे. त्याची वार्षिक तपासणी करून स्टॅम्पिंग सर्टिफिकेट देण्यासाठी गायकवाडने 12 हजार रुपयांची या संस्थेच्या व्यवस्थापकाकडे मागणी केली होती. यानंतर दहा हजार रुपयांवर तडजोड करून ती रक्कम घेताना, पेट्रोल पंपावरच त्याला रंगेहाथ पकडलं गेलं आणि लोणी पोलिस ठाण्यात लाचखोरीचा गुन्हा त्याबाबत दाखल करण्यात आला आहे.(ACB action in Pune)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, ही ट्र्रॅपची कारवाई केलेल्या नगर एसीबीने गायकवाडच्या सिंहगड रोड,पुणे येथील घराची झडती घेण्यास पुणे एसीबी युनीटला सांगितले. त्यानुसार पीआय विद्युलता चव्हाण, सहाय्यक फौजदार मुकुंद अयाचित, हवालदार नवनाथ वाळके तसेच दामोद जाधव या पथकाने गायकवाडच्या निवासस्थानाची झडती घेतली. त्यात साडेअठ्ठावीस लाखांची रोख रक्कम त्यांच्या हाती लागली. पुणे एसीबीचे एसपी अमोल तांबे,अतिरिक्त एसपी डॉ.शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

एपीआय शरद पवारलाही अटक -

दरम्यान, लाचखोरीच्या दुसऱ्या एका मोठ्या कारवाईत ठाणे एसीबीने भिवंडीच्या नारपोली पोलिस ठाण्यातील एपीआय शरद बबन पवार (वय 37) याला दोन लाख रुपयांची लाच घेताना काल (ता.29) पकडले.

विशेष म्हणजे पोलिस ठाण्यातच एका महिलेकडून ही लाच घेण्याचे धाडस त्याने केले. तिच्या मुलाला खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्याचा तपास पवार हा करीत होता. त्यात मदत करण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT