Pune Manapa
Pune Manapa Sarkarnama
पुणे

कोरोना काळात "पीएफआय"सोबत पुणे पालिकेने कसला करार केला होता ?

सरकारनामा ब्यूरो

पुणे : वादग्रस्त पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडीयाच्या कार्यकर्त्यांवर एनआयए आणि एटीएसकडून देशभरात कारवाई करण्यात येत आहे. त्याच्या सदस्यांची संशयित म्हणून धरपकड करण्यात आले आहे. पण यादरम्यान पुण्यात पीएफआय संबधित आणखी एका मुद्दयावरून वाद निर्माण झाला आहे. कोविड काळात २०२० मध्ये मृताचा आकडा वाढल्याने मुस्लिम समाजातील व्यक्तीचे दफनविधी करण्यासाठी पुणे पालिकेने पीएफआयची मदत घेतली.

एकीकडे पीएफआयवर कारवाई सुरू असताना, या संघटनेचा देशविरोधी कारवायांमध्ये संबध आहेत, असं केंद्रिय यंत्रणा आरोप करत आहे. असे असताना पुणे महानगरपालिकेने कोविड काळात मृताचा आकडा वाढल्याने मुस्लिम समाजातील व्यक्तीचे दफनविधी करण्यासाठी पीएफआयची मदत कोणत्या आधारावर घेतली होती? असा मुद्दा उपस्थित होत आहे.

महापालिका आयुक्तांच्या आदेशाने जवळपास दोन महिने पीएफआय या संस्थेशी पालिका कोरोनाकाळात संबधित होती. पुणे महानगरपालिकेने या संघटनेशी करार केला होता. मात्र त्यावेळी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील सत्ताधारी भाजपला सांगितल्यानंतर पालिकेकडून हा निर्णय रद्द करण्यात आला.

मुरलीधर मोहोळ महापौर असताना त्यांनी तातडीनं हा करार केला रद्द होता. १३ एप्रिल २०२० मध्ये करण्यात आलेला हा करार पालिकेने २ जून २०२० रद्द केला होता. विशेष म्हणजे आता एटीएसच्या अटकेत असलेल्या 'राझी अहमद खान' हा पालिकेच्या करारानुसार झालेलं काम पाहत होता. त्यामुळे आता हा तीव्र वादाचा मुद्दा उपस्थित झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT