Sharad Pawar News Sarkarnama
पुणे

Sharad Pawar on Ajit Pawar: भविष्यातील आश्वासक चेहरा कोणता...? शरद पवारांनी दिलं उत्तर...

सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यावर मी मोठी जबाबदारी सोपवली होती. पण...

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar on Ajit Pawar : मी आयुष्यातली पहिली निवडणूक लढवली, ते चिन्ह होतं दोन बैल यांचं. त्यानंतर चरखा चिन्हावर दुसरी निवडणूक लढवली. त्याआधी गाय-वासरू या चिन्हावर निवडणूक लढवली. नंतर घड्याळ चिन्हावरही निवडणूक लढवली. त्यामुळे चिन्ह महत्त्वाच नाही. समोरचा माणूस कोण आहे हे लोक बघतात, त्याचं काम काय आहे ते पाहतात. तेवढा महाराष्ट्राच्या जनतेवर माझा विश्वास आहे. आतापर्यंत मी १४ निवडणुका लढवल्या. त्या निवडणुकीत लोकांनी मला निवडून दिलं, त्याअर्थी जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांना राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण असेल, असा प्रश्न विचारण्यात आला, यावेळी त्यांनी "राष्ट्रवादी काँग्रेसचा सगळ्यात आश्वासक चेहरा शरद पवार" अशी प्रतिक्रियाही दिली.

अजित पवार यांच्याबरोबर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अजून काही जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत या सर्व घडामोडींवर भाष्य केलं आहे."राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सहकारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाले आहेत. याचे सर्व श्रेय हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जातं", अशी खोचक टीका शरद पवार यांनी केली.

शरद पवार(Sharad Pawar) यांनी रविवारी (दि.२ जुलै) पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीतील उभ्या फुटीवर थेट भाष्य केलं, पवार म्हणाले, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यावर मी मोठी जबाबदारी सोपवली होती. मात्र आता त्यांच्यावरचा माझा विश्वास उडाला आहे असे स्पष्ट करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी बोलून बंडखोर आमदारांवर कारवाई करणार असल्याचा इशारा पवारांनी दिला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT