narendra-modi-chagan-bhujbal
narendra-modi-chagan-bhujbal 
पुणे

नरेंद्र मोदी भुजबळांना काय म्हणाले?

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात देशातील सर्व राज्यांच्या पोलिस महासंचालकांची दोन दिवसांची परिषद पुण्यात घेतली. त्यांच्या स्वागतासाठी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हजर होते. आज निरोप देण्यासाठी राज्य सरकारतर्फे मंत्री छगन भुजबळ हे उपस्थित राहिले. 

भुजबळ यांच्याशी मोदींनी हसतमुखाने हस्तांदोलन केले. दोघांत संवादही झाला. या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

पंतप्रधान किंवा इतर मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी राजशिष्टाचार मंत्री नेमलेला असतो. राज्यातील मंत्रिमंडळाचे अद्याप खातेवाटप न झाल्याने या विभागासाठी अद्याप मंत्री नाही. पंतप्रधानांचे स्वागत करून भुजबळ हे तातडीने नाशिकला रवाना झाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT