Shivsena-NCP
Shivsena-NCP Sarkarnama
पुणे

Maha vikas aaghadi : शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता : कॉंग्रेस काय करणार ?

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राज्यातील आगामी निवडणुकांसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (Shivsena And Nationlist Congress) एकत्रित येण्याची शक्यता आहे. हे दोन्ही पक्ष एकत्रित आले तर त्यांच्यासोबत कॉंग्रेसने जाणार का ही चर्चा सुरू झाली आहे. भारतीय जनता पार्टी (Bhartiya Janata Party), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) निवडणुका एकत्रित लढणार हे आता जवळपास निश्‍चित झाले आहे. या पाश्‍र्वभूमीवर शिवसेना व राष्ट्रवादीला एकत्रित येण्याशिवाय पर्याय दिसत नाही. मात्र, त्यांना कॉंग्रेसची साथ मिळणार का ? हा खरा प्रश्‍न आहे.

राज्यातील महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होतील. या निवडणुकांची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री या अमित शाह यांचा मुंबई दौरा या निवडणुकांची नांदी ठरवणारा होता. शाह यांच्या दौऱ्याचे मोठे नियोजन आणि माध्यमातून चर्चा होईल, अशी काळजी घेण्यात आली. या दौऱ्यात शाह यांनी मुंबई महापालिका काहीही करून जिंकायचीच असा आदेशच दिला आहे.

शाह यांचा मुंबई दौरा. या काळातच गणपती दर्शनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आक्रमक झाल्याचे दिसत आहे. मुंबई महापालिका निवडणूक शिवसेनेकडून खेचून आणायची हेच साऱ्या राजकीय घडामोडींचे मुख्य कारण आहे.

राज ठाकरे यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री स्वतंत्रपणे भेटले. त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच. मात्र, निवडणुकीत मराठी मतांचा टक्का वाढविण्यासाठी राज ठाकरेंची या दोन्ही पक्षांना गरज आहे. शिवसेनेला पराभूत करायचे असेल तर मनसेला सोबत घेतलेच पाहिजे, ही भूमिका अमित शाह यांनीच घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना सोबत घेण्याशिवाय भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला पर्याय नसल्याचे सांगितले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT