when kolhapur under flood where was u chadrakant dada prithviraj chavan question
when kolhapur under flood where was u chadrakant dada prithviraj chavan question 
पुणे

चंद्रकांतदादा हे पार्ट टाईम पालकमंत्री :पृथ्वीराज चव्हाण

ब्रीजमोहन पाटील

पुणे : कोल्हापूरमधील पुराला कॉंग्रेस जबाबदार आहे, असा आरोप करणारे चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचे "पार्ट टाईम' पालकमंत्री आहेत. सांगली-कोल्हापूरकर संकटात असताना हे कुठे होते, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाटील यांना विचारला आहे. 

पुण्यात बोलताना चव्हाण म्हणाले, ""कोल्हापूर आणि सांगलीत पूर आल्यावर तेथील दोन्ही पालकमंत्री गायब होते. याउलट 2005 साला आलेल्या पुराच्यावेळी तत्कालिन पालकमंत्री तेथे ठाण मांडून होते. त्यांनी लोकांना मदत केली. पण आता पूर आल्यानंतर भाजपचे पालकमंत्री सुरवातीला तेथे फिरकलेदेखील नाहीत. त्यांच्याकडे पक्षाची जबाबदारी आहे. ते पुण्याचे पालकमंत्री आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ते कोल्हापूरचे "पार्ट टाईम' पालकमंत्री आहेत.'' 

कोयना धरणाच्या पुरावर नियंत्रण करण्यासाठी अराजकीय उच्चस्तरीय तांत्रिक समिती नेमणे आवश्‍यक आहे. त्यामधील तज्ज्ञ पूर नियंत्रणासाठी अभ्यास करून उपाय सुचवू शकतात, असे चव्हाण यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT