Bhima-Patas sugar Factory Sarkarnama
पुणे

Bhima Patas sugar Factory : राहुल कुल यांच्या भीमा-पाटस कारखान्याबाबत भाजप नेत्याची मोठी मागणी

कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल हे यंदा स्वपक्षाचे (भाजप) आमदार असले तरी अध्यक्ष म्हणून मी त्यांना यापूर्वी देखील कारखान्याच्या आर्थिक स्थिती व धोरणांविषयी सतत प्रश्न केले आहेत.

सरकारनामा ब्यूरो

दौंड (जि. पुणे) : दौंड (Daund) तालुक्यातील कर्जबाजारी असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याची आर्थिक स्थिती सभासदांसमोर येण्याकारिता श्वेतपत्रिका काढण्याची गरज आहे, अशी मागणी भाजप (BJP) किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा कारखान्याचे माजी संचालक वासुदेव काळे यांनी केली. (White paper of Bhima Patas factory should be issued: BJP leader Vasudev Kale's demand)

दौंड शहरात पत्रकारांशी बोलताना वासुदेव काळे यांनी ही माहिती दिली. वासुदेव काळे म्हणाले की, तीन गळित हंगाम बंद राहिलेला पाटस (ता. दौंड) येथील भीमा सहकारी साखर कारखाना खासगी कंपनीस चालविण्यात देण्यात आला आहे. मात्र, तो सहकारी साखर कारखाना राहावा, ही भूमिका आणि अपेक्षा आमची आहे. कारखान्यावर झालेल्या कर्जाविषयी वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहून मी सातत्याने विचारणा केली आहे.

कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल हे यंदा स्वपक्षाचे (भाजप) आमदार असले तरी अध्यक्ष म्हणून मी त्यांना यापूर्वी देखील कारखान्याच्या आर्थिक स्थिती व धोरणांविषयी सतत प्रश्न केले आहेत. परंतु ठोस उत्तर मिळालेले नाही. कारखान्याच्या निवडणुका लढवून सभासदांची बाजू मांडलेली आहे. कारखान्याची नेमकी आर्थिक स्थिती काय आहे व त्याला कोण जबाबदार आहे , हे समजून घेण्याकरिता श्वेतपत्रिका काढली पाहिजे, या मागणीचा काळे यांनी पुनरुच्चार केला.

ते पुढे म्हणाले की, दौंड तालुक्यातील उसाचे वाढते क्षेत्र, उसाची गुऱ्हाळे, तालुक्यातील कारखान्यांचे सहवीजनिर्मिती आणि आसवनी प्रकल्प, गाळप क्षमता, इंधनात इथेनॅाल मिश्रणाच्या मर्यादेत वाढ झाल्यानंतर त्याला आलेले महत्व, उपपदार्थांचे उत्पादन, ऊस दराची स्पर्धा, आदींचा विचार करून कारखान्याचे नियोजन आणि व्यवस्थापन झाले पाहिजे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT